'पठाण'मध्ये शाहरुख खानसोबत पहिल्यांदा जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण ही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By गीतांजली | Published: October 21, 2020 04:27 PM2020-10-21T16:27:56+5:302020-10-21T17:12:57+5:30

शाहरुखचे फॅन्स त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत.

Shah rukh khan to begin shooting for pathan next month first time with john abraham deepika padukone | 'पठाण'मध्ये शाहरुख खानसोबत पहिल्यांदा जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण ही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'पठाण'मध्ये शाहरुख खानसोबत पहिल्यांदा जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण ही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान 2018 मध्ये आलेल्या 'झिरो' सिनेमात शेवटचा दिसला होता. झिरो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर सिनेमांपासून किंग खान काहीसा दूर झाला. यावेळेत शाहरुख कुटुंबात सोबत वेळ घालवताना दिसला. आता मात्र तो सेटवर पुन्हा परतला आहे. 

शाहरुख खानने जवळपास 2 वर्षानंतर पठाण सिनेमाची शूटिंगला सुरुवात करणार  आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम दिसणार आहेत. शाहरुख आणि जॉन पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. सिनेमाचे शूटिंग मुंबईतल्या यशराज स्टुडिओमध्ये होणार आहे.आधी या सिनेमाचे शूटिंग परदेशात होणार होते मात्र आता बरेचसे शूटिंग मुंबईतच होणार आहे.  सिनेमाच्या कथेचा केंद्रबिंदू शाहरुख खान असणार आहे. शाहरुखला 2021मध्ये दीपिका पादुकोण आणि जॉन शूटिंगसाठी ज्वॉईन करणार आहेत. शाहरुखचे फॅन्स त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत.   

शाहरुखच्या 'डीडीएलजे'ला 25 वर्षे पूर्ण 
मंगळवारी 20 ऑक्टोबरला शाहरुख खानचा सुपरहिट सिनेमा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ला (डीडीएलजे) 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.डीडीएलजेने बॉक्स ऑफिसचे सारे रेकॉर्ड मोडले आणि हिंदी सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सदाबहार ब्लॉकब्लस्टर सिनेमा ठरला. हा आजवरचा सर्वाधिक काळ चाललेला सिनेमाही ठरला आहे.डीडीएलजेने १० फिल्मफेअर पुरस्कार (एकाच वेळी) जिंकण्याचा विक्रमही केला आहे. या सिनेमाने जणू जगभरात बॉलिवुडचा चेहराच बदलून टाकला.

Web Title: Shah rukh khan to begin shooting for pathan next month first time with john abraham deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.