दीड वर्षांपासून घरी बसलाय शाहरूख खान, काम नसल्याने उडवली स्वत:च स्वत:ची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:35 AM2020-07-19T10:35:39+5:302020-07-19T10:36:21+5:30

गौरी खानने एक ट्वीट केले. ते पाहून एसआरके स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने स्वत: स्वत:ची खिल्ली उडवली.

shah rukh khan comment to wife gauri khan tweet with wax statue | दीड वर्षांपासून घरी बसलाय शाहरूख खान, काम नसल्याने उडवली स्वत:च स्वत:ची खिल्ली

दीड वर्षांपासून घरी बसलाय शाहरूख खान, काम नसल्याने उडवली स्वत:च स्वत:ची खिल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊननंतर शाहरूख घरीच आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. यात तो त्याच्या घराच्या बाल्कनीत शूट करताना दिसला होता.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान  अभिनयासोबतच त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखला जातो. आता शाहरूखने काय करावे तर स्वत:च स्वत:ची खिल्ली उडवली. होय, गौरी खानने एक ट्वीट केले. ते पाहून एसआरके स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने स्वत: स्वत:ची खिल्ली उडवली.
तर गौरीने सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. यात ती पॅरिसस्थित शाहरूखच्या मेणाच्या पुतळ्यासोबत पोज देताना दिसतेय. या फोटोला गौरीने मजेशीर कॅप्शन दिले.

‘दोघांना सांभाळणे म्हणजे जरा जास्तच’, असे गौरीने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले.
गौरीच्या ट्वीटवर शाहरूखनेही कमेंट केली. ‘और पिछले एक साल और छह महिने से दोनों घर पे है...’, असे त्याने लिहिले.

शाहरूखची ही कमेंट त्याच्या स्वत:साठी होती. त्याचा अखेरचा सिनेमा ‘झिरो’ डिसेंबर 2018 मध्ये रिलीज झाला होता. तेव्हापासून शाहरूख एकाही सिनेमात दिसलेला नाही. अद्याप शाहरूखने आपल्या कुठल्याच नव्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. अर्थात लवकरच तो राजकुमार हिराणीच्या एका सिनेमात दिसणार असल्याची चर्चा आहे.
लॉकडाऊननंतर शाहरूख घरीच आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. यात तो त्याच्या घराच्या बाल्कनीत शूट करताना दिसला होता. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. मात्र हे शूट कुठल्या सिनेमाचे नव्हते तर एका जाहिरातीसाठी होते.

Web Title: shah rukh khan comment to wife gauri khan tweet with wax statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.