बॉलिवूड किंग खान शाहरुखने सासूसोबत केला डान्स, सोशल मिडियावर Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:04 PM2024-10-28T12:04:59+5:302024-10-28T12:06:03+5:30

दुबईतील किंग खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khan Dances With Mother-in-law Savita Chibber At Son Aryan’s Brand Launch Party In Dubai | बॉलिवूड किंग खान शाहरुखने सासूसोबत केला डान्स, सोशल मिडियावर Video Viral

बॉलिवूड किंग खान शाहरुखने सासूसोबत केला डान्स, सोशल मिडियावर Video Viral

बॉलिवूडचा किंग खान हा कायम  कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता दुबईतील किंग खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किंग खान हा आपल्या सासूसोबत थिकरताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय.

नुकतेच शाहरुखने त्याचा लाडका लेक आर्यन खानच्या कपड्यांच्या ब्रँडच्या  कार्यक्रमात हजेरी लावली होती. हा कार्यक्रम दुबईत पार पडला. या कार्यक्रमात गौरी खानची आई सविता छिब्बरही उपस्थित होती. यावेळी शाहरुखने आपल्या सासूसोबत जबरदस्त डान्स केला.  सासू आणि जावई यांचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  यात शाहरुख खान आपल्या सासूचा हात धरून नाचत असल्याचे दिसत आहे.

शाहरुखने 2023 मध्ये पाच वर्षांनी दमदार पुनरागमन केलं आणि एका वर्षात 'जवान', 'पठाण', 'डंकी' हे तीन सुपरहिट चित्रपट दिले. तर त्याची लाडकी लेक सुहान खान हिने 'द आर्चीज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आता लवकरच शाहरुख आणि सुहाना हे 'किंग' या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. अद्याप किंग सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पण हा सिनेमा 2026 च्या ईदला रिलीज होईल, अशी शक्यता आहे. 

Web Title: Shah Rukh Khan Dances With Mother-in-law Savita Chibber At Son Aryan’s Brand Launch Party In Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.