​‘डॉन 3’मध्ये शाहरुखच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 08:46 PM2016-10-28T20:46:22+5:302016-10-29T09:27:26+5:30

‘डॉन’ सिरीजच्या निर्मात्यांपैकी एक रितेश सिधवानी यांनी सोशल मीडियावर डॉन3 संदर्भातील एक पोस्ट केली आहे.

Shah Rukh Khan in 'Don 3'! | ​‘डॉन 3’मध्ये शाहरुखच!

​‘डॉन 3’मध्ये शाहरुखच!

googlenewsNext
ong>बॉलिवूडाचा किंग खान शाहरुख पुन्हा एकदा ‘डॉन’च्या म्हणून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. निर्मात्यांनी ‘डॉन 3’ प्रोजेक्टवर काम करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे डॉनच्या तिसºया सिक्वलमध्ये डॉन म्हणून शाहरुखच असेल असे संकेत मिळत आहे. ‘डॉन’ सिरीजच्या निर्मात्यांपैकी एक रितेश सिधवानी यांनी सोशल मीडियावर डॉन3 संदर्भातील एक पोस्ट केली आहे. त्यावरून हा अंदाज लावण्यात येत आहे. 

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी अमिताभ बच्चन अभिनित डॉन या चित्रपटाचा रिमेक केला होता. यात शाहरुख खान व प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘डॉन’चा सिक्वल ‘डॉन 2’मध्ये हीच जोडी रिपिट करण्यात आली. या दोन्ही चित्रपटाला मिळालेले यश पाहता. ‘डॉन 3’ तयार करण्याचा निर्णय एक्सेल एन्टरटेनमेंटने घेतला असल्याचे समजते. ‘डॉन 3’च्या निर्मितीमध्ये शाहरुखची रेड चिलीज एन्टरटेनमेंचा देखील सहभाग असणार आहे. एक्सेल एन्टरटेनमेंट ही फरहान अख्तर व रितेश सिधवानी यांचे प्रोडक्शन हाऊस आहे. 

">http://


एक्सेल एन्टरटेनमेंटला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रितेश सिधावनी याने इन्स्टाग्रावर एक पोस्ट केले आहे. या पोस्टवरून ‘डॉन 3’ लवकरच येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रितेशने पोस्ट केलेल्या स्टेटसमध्ये शाहरुख खान दिसतो आहे. या पोस्टमध्ये रितेश म्हणतो, एक्सेल एन्टरटेनमेंटच्या चित्रपटात डॉन सर्वांत कुल होता. ‘डॉन 3’ असे त्याने लिहले आहे. दुसरीकडे शाहरुखच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार झालेल्या बहुतांश चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका असतात हे विशेष. काही दिवसांपूर्वी ‘डॉन 3’मध्ये फरहान अख्तर मुख्य भूमिका करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. रितेशने केलेल्या पोस्टमुळे या विराम लागला असल्याचे दिसते. फरहान व रितेश सध्या ‘रॉक आॅन 2’ तर शाहरुख ’रईस’ या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.

Web Title: Shah Rukh Khan in 'Don 3'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.