सैफ, अक्षयनंतर आता ‘किंगखान’ शाहरुख खानचा होणार ‘डिजिटल डेब्यू’!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 03:38 PM2019-03-17T15:38:45+5:302019-03-17T16:24:25+5:30

नुकतीच अक्षयने ‘द एंड’ या त्याच्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. आता किंग खान शाहरूख खान यानेही डिजिटलकडे आपला मोर्चा वळवला आहे.

Shah Rukh Khan to make his digital debut with a thriller web-series? | सैफ, अक्षयनंतर आता ‘किंगखान’ शाहरुख खानचा होणार ‘डिजिटल डेब्यू’!

सैफ, अक्षयनंतर आता ‘किंगखान’ शाहरुख खानचा होणार ‘डिजिटल डेब्यू’!

googlenewsNext
ठळक मुद्देसुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. अलीकडे रिलीज झालेला त्याचा ‘झिरो’ हा सिनेमा दणकून आपटला.

आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे, जमाना डिजिटलचा आहे आणि म्हणूनच बॉलिवूडचे बडे बडे स्टार्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर यायला उत्सूक आहेत. सैफ अली खाननंतर अक्षय कुमार या प्लॅटफॉर्मवर येतोय. नुकतीच अक्षयने ‘द एंड’ या त्याच्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. आता किंग खान शाहरूख खान यानेही डिजिटलकडे आपला मोर्चा वळवला आहे.
शाहरूख लवकरच आपला डिजिटल डेब्यू करतोय. एका थ्रीलर वेब सीरिजमध्ये शाहरूख दिसू शकतो. शाहरुखने या वेबसीरिजची कथा ऐकली नि लगेच त्यास होकार दिला. शाहरूखची प्रॉडक्शन कंपनी रेड चिली एंटरटेनमेंट ही वेबसीरिज प्रोड्यूस करेल, असे कळतेय. तूर्तास शाहरुखच्या या वेब सीरिजबद्दल अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही. पण लवकरच याबद्दल घोषणा होणे अपेक्षित आहे.


सुपरस्टार शाहरुख खान दीर्घकाळापासून एका ‘हिट’च्या प्रतीक्षेत आहे. अलीकडे रिलीज झालेला त्याचा ‘झिरो’ हा सिनेमा दणकून आपटला. मोठा गाजावाजा करत ‘झिरो’ रिलीज झाला. पण प्रेक्षक आणि समीक्षक दोन्हींकडून या चित्रपटाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला. शाहरुखचा सर्वोत्कृष्ट अभिनय असूनही चित्रपटाची सुमार कथा ‘झिरो’ला घेऊन डुबली. त्याआधीचे त्याचे चित्रपटही असेच आपटलेत. सध्या शाहरुखकडे एकही चित्रपट नाही. ( संजय लीला भन्साळींच्या एका चित्रपटात शाहरूख व सलमानची जोडी दिसणार असल्याची खबर आहे. पण याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.) अशात वेब सीरिज करण्याचा निर्णय शाहरूखने घेतला असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Shah Rukh Khan to make his digital debut with a thriller web-series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.