Farhan Akhtar Wedding: फरहान अख्तरच्या लग्नात का उपस्थित नव्हता शाहरुख खान? कारण कळालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 19:14 IST2022-02-25T19:13:08+5:302022-02-25T19:14:49+5:30
शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. मोठ्या थाटामाटात फरहान-शिबानीचा लग्न सोहळा पार पडला.

Farhan Akhtar Wedding: फरहान अख्तरच्या लग्नात का उपस्थित नव्हता शाहरुख खान? कारण कळालं...
शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. मोठ्या थाटामाटात फरहान-शिबानीचा लग्न सोहळा पार पडला. रितेश सिधवानीनं याच पार्श्वभूमीवर एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत मनोरंजन विश्वातील बडे कलाकार उपस्थित होते. मग यात बॉलीवूडचा 'किंग खान' शाहरुख मात्र अनुपस्थित होता. फरहान आणि शाहरुख यांची चांगली मैत्री आहे. त्यामुळे फरहानच्या लग्नाला शाहरुखच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर यामागचं कारण समोर आलं आहे.
एका हिंदी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीत सुत्रांच्या म्हणण्यानुसार शाहरुख सध्या प्रसिद्धीपासून दूर राहू इच्छित आहे. तो स्वत:ला माध्यमं आणि कॅमेरांपासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या भूमिकेत आहे. याच कारणामुळे त्यानं फरहानच्या लग्नाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे. याचं कारण विचारलं असता यामागे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात जाऊन आल्यापासून शाहरुखनं सार्वजनिक ठिकाणी जाणं बंद केलं आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर शाहरुख फक्त दोनवेळा सार्वजनिकरित्या सर्वांसमोर आलेला पाहायला मिळाला होता. पहिली वेळ म्हणजे पठाण चित्रपटाच्या शुटिंगसाठी तो बाहेर पडला होता आणि त्याचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता. दुसरी वेळ म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी तो सार्वजनिक पातळीवर सर्वांसमोर आला होता.
सुपरस्टार शाहरुख खान जरी फरहान अख्तरच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नसला तरी नव दाम्पत्याला त्यांनी फोन करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसंच शाहरुखचे कुटुंबीय मात्र कार्यक्रमात सहभागी झाले होते.