शाहरूख की सलमान कोणाकडे आहे सर्वात जास्त बँक बॅलेन्स?, करण जोहरच्या शोमध्ये अजय देवगणचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:36 PM2023-12-22T17:36:42+5:302023-12-22T17:37:32+5:30
सध्या 'कॉफी विथ करण'चा सीझन ८ देखील खूप चर्चेत आहे. अलीकडेच सिंघम फेम अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) करण जोहरच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते.
'कॉफी विथ करण' (Koffee With Karan Show) हा सेलिब्रिटी टॉक शोचा प्रत्येक सीझन प्रचंड हिट झाला आहे. करण जोहर(Karan Johar)चा प्रसिद्ध शो सतत चर्चेत असतो. सध्या 'कॉफी विथ करण'चा सीझन ८ देखील खूप चर्चेत आहे. करणच्या शोमध्ये अनेक सेलेब्सने हजेरी लावली आहे. अलीकडेच सिंघम फेम अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) करण जोहरच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. शोमध्ये करण, अजय आणि रोहितने एकत्र खूप धमाल केली.
नेहमीप्रमाणे करणने शोमधील पाहुण्यांना मजेशीर प्रश्न विचारले. करणने अजयला असा प्रश्न विचारला की सिंघम अभिनेताही थोडा वेळ गोंधळला.करण जोहरच्या शोमध्ये अजय आणि रोहित खूप हसले. रॅपिड-फायर राउंडमध्ये करणने अजयला विचारले की, शाहरुख आणि सलमानपैकी कोणावर विश्वास ठेवता येईल, या प्रश्नाचे अजयने अतिशय हुशारीने उत्तर दिले. तो म्हणाला की, बँक बॅलेन्सनुसार मला वाटते की शाहरुख खानकडे जास्त आहे.
अजय देवगणचे उत्तर ऐकून करण जोहरनेही होकार दिला आणि होय. विशेषत: यावर्षी' म्हणाला. शाहरुख खानसाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. यावर्षी त्याचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती आणि चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होताच पहिल्याच दिवशी ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकही आले होते. 'डंकी'ने पहिल्याच दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा शाहरुख खानच्या मागील पठाण आणि जवान या चित्रपटांपेक्षा कमी आहे.