शाहरुख खानच्या 'पठाण'चा येणार सीक्वल?, जॉन अब्राहमने भूमिकेबद्दल दिली मोठी हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:22 IST2025-02-25T18:22:07+5:302025-02-25T18:22:40+5:30

John Abraham on Pathaan Movie Sequel : जॉन अब्राहम 'पठाण'मध्ये जिमच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्याने चित्रपटाच्या सीक्वलबाबत मोठी हिंट दिलीय.

shah rukh khan pathaan sequel to be made john abraham drops hint about his presence as jim | शाहरुख खानच्या 'पठाण'चा येणार सीक्वल?, जॉन अब्राहमने भूमिकेबद्दल दिली मोठी हिंट

शाहरुख खानच्या 'पठाण'चा येणार सीक्वल?, जॉन अब्राहमने भूमिकेबद्दल दिली मोठी हिंट

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा पठाण चित्रपट (Pathaan Movie) २०२३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून किंग खानने बऱ्याच वर्षानंतर थिएटरमध्ये दमदार पुनरागमन केले होते. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता प्रेक्षकांना पठाणच्या सीक्वलची प्रतीक्षा आहे. दरम्यान या सीक्वलबाबत अभिनेता जॉन अब्राहमने मोठी हिंट दिली आहे.

जॉन अब्राहम 'पठाण'मध्ये जिमच्या भूमिकेत दिसला होता. हॉलिवूड रिपोर्टरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जॉनने 'पठाण २' आणि त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले. जेव्हा जॉनला त्याच्या चित्रपटांच्या निवडीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की त्या चित्रपटात मनोरंजक काही नसेल तर त्याला मोठ्या फ्रँचायझी चित्रपटांचा भाग बनायचे नाही. 

'पठाण'बद्दल अभिनेता म्हणाला..

जॉन अब्राहमला 'पठाण'च्या सीक्वलमध्ये इंटरेस्ट घेण्याबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की, या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा खूप खास आणि छान आहे. जॉनने आदित्य चोप्रासोबत धूम, न्यूयॉर्क, काबुल एक्सप्रेस आणि 'पठाण' सारख्या चित्रपटात काम केले आहे. तो म्हणाला की, 'मला वाटते की आदित्यने मला या सिनेमासाठी योग्य समजले आहे आणि आशा आहे की आम्ही जिमसाठी प्रीक्वल बनवू. 

जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' होळीला होणार  रिलीज
जॉन अब्राहम सध्या त्याच्या आगामी 'द डिप्लोमॅट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. शिवम नायर दिग्दर्शित हा एक राजकीय-थ्रिलर आहे. हा चित्रपट होळीच्या वीकेंडला म्हणजेच १४ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: shah rukh khan pathaan sequel to be made john abraham drops hint about his presence as jim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.