Shah Rukh Khan: लोक बॉलिवूड सिनेमे पाहणं बंद करतील..., शाहरूखने 11 वर्षांपूर्वीच वर्तवलं होतं भाकीत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 12:48 PM2022-10-07T12:48:59+5:302022-10-07T12:49:12+5:30

Shah Rukh Khan: लोकांचा बॉलिवूड सिनेमांमधला इंटरेस्ट का कमी झाला? यामागे वेगवेगळी कारणं आहेत. खरं असं काही होईल, याची कल्पना कधीही कुणी केली नव्हती. अपवाद फक्त शाहरूख खानचा...

Shah Rukh Khan Predicted About The Future Of Bollywood Films | Shah Rukh Khan: लोक बॉलिवूड सिनेमे पाहणं बंद करतील..., शाहरूखने 11 वर्षांपूर्वीच वर्तवलं होतं भाकीत!!

Shah Rukh Khan: लोक बॉलिवूड सिनेमे पाहणं बंद करतील..., शाहरूखने 11 वर्षांपूर्वीच वर्तवलं होतं भाकीत!!

googlenewsNext

बॉलिवूडवर (Bollywood) गेल्या अनेक दिवसांपासून टीका होतेय. या ना त्या निमित्ताने बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याची मागणी होतेय. बॉलिवूड सिनेमांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत. लोकांचा बॉलिवूड सिनेमांमधला इंटरेस्ट कमी का झाला? यामागे वेगवेगळी कारणं आहेत. खरं असं काही होईल, याची कल्पना कधीही कुणी केली नव्हती. अपवाद फक्त शाहरूख खानचा (Shah Rukh Khan). होय, कारण शाहरूखने 11 वर्षांपूर्वीच असं भाकीत वर्तवलं होतं. तर कदाचित लोक बॉलिवूडचे सिनेमे पाहणं बंद करतील, असं शाहरूख एका मुलाखतीत म्हणाला होता.
2011 साली प्रीती झिंटासोबत दिलेल्या मुलाखतीत शाहरूख बोलला होता.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीनं नवे प्रयोग करणं बंद केलेत तर लोक बॉलिवूडचे सिनेमे पाहणं बंद करतील. बॉलिवूडला लार्जर दॅन लाईफ सिनेमे बनवायला हवेत. कारण असं केलं नाही तर तरूण पिढी बॉलिवूड सिनेमांकडे ढुंकूनही बघणार नाही. ते हॉलिवूड चित्रपटांकडे वळतील. माझ्या मते, आपल्या पौराणिक कथांमधल्या सुपरहिरोंची ओळख तरूण पिढीला व्हायला हवी. आपल्याकडे खूप चांगल्या कथा आहेत. बॉलिवूडचे काही दिग्गज दिग्दर्शक निर्मात्यांचा मी मित्र आहेत. पण ते सर्व मूर्ख आहेत. कारण त्यांना फक्त रोमॅन्टिक सिनेमे बनवायचे आहेत. मला मात्र यापुढे जाऊन जगावर राज्य करायचं आहेत. लंडन, अमेरिकेतील भारतीयांना सांगायला अभिमान वाटेल, असे सिनेमे आपल्याला बनवायला हवेते. हा सिनेमा भारतात तयार झाला आहे, हे सांगताना त्यांना अभिमान वाटावा, असे चित्रपट बनवणं ही काळाची गरज आहे, असं शाहरूख म्हणाला होता.

10 वर्षांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते, त्यावेळी शाहरूखने हे भाकीत वर्तवलं होतं. तेव्हा लोक केवळ चित्रपटगृहांत इंटरनॅशनल सिनेमे बघू शकत होते. पण गेल्या 10 वर्षांत काळ झपाट्याने बदलला आहे आणि शाहरूख म्हणाला, तशी लोकांची रूचीही बदलली आहे. भारतीय प्रेक्षकांना आता आरआरआर, केजीएफ, पुष्पा सारखे लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आवडू लागले आहेत.

Web Title: Shah Rukh Khan Predicted About The Future Of Bollywood Films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.