इमरान खान यांच्यावर गंभीर आरोप करणा-या रेहमच्या नजरेत कसा आहे शाहरूख खान?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 10:44 AM2018-07-17T10:44:45+5:302018-07-17T10:46:39+5:30
रेहम खान हिच्या आत्मचरित्रातील अनेक खळबळजनक आरोपांमुळे तहरीक- ए -इन्साफचे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान वादात सापडले आहेत. रेहमच्या पुस्तकात किंगखान शाहरूख खान याचाही उल्लेख आहे.
रेहम खान हिच्या आत्मचरित्रातील अनेक खळबळजनक आरोपांमुळे तहरीक- ए -इन्साफचे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान वादात सापडले आहेत. रेहम ही इमरान यांची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. आपल्या आत्मचरित्रात इमरान समलैंगी असल्याचा आरोप तिने केला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रमवरही तिने गंभीर आरोप केला आहे. वसीमने पत्नीला एका परपुरूषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे तिने आपल्या पुस्तकात म्हटले आहे. याच रेहमच्या पुस्तकात किंगखान शाहरूख खान याचाही उल्लेख आहे.
२००८ मध्ये रेहम आणि शाहरूखची भेट झाली होती. त्यावेळी रेहम एका न्यूज चॅनेलशी जुळलेली होती. रेहम या भेटीबद्दल आपल्या पुस्तकात लिहिते की, २००८ मध्ये एका इव्हेंटमध्ये मी शाहरूखला भेटले. तो त्या इव्हेंटमध्ये सर्वांचे आकर्षण होता. मी त्याच्या वागण्याने कमालीचे प्रभावित झाले. तो अहंकार नसलेला एका मध्यवर्गीय कुटुंबातील सुसंस्कृत व्यक्ती आहे. त्याचा विनम्र स्वभाव वाखाणण्याजोगा आहे.
तुम्हाला ठाऊक असेलचं की, रेहमने आपल्या पुस्तकात इमरान यांच्याबद्दल बरेच काही लिहिले आहे. इमरान यांना ड्रग्जचे व्यसन आहे. इम्रान खान गे आहे. त्याने तिला त्याच्या मित्रांबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. लग्नापूर्वी इम्रान खाने तिचा छळ केला होता, असे तिने लिहिले आहे. ६ जानेवारी २०१५ मध्ये रेहम व इमरान यांचे लग्न झाले होते. मात्र १० महिन्यांतचं त्यांचे लग्न तुटले होते.
पाकिस्तानमध्ये सध्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. इमरान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यास इच्छुक आहेत. त्यातच रेहमने हे पुस्तक प्रकाशित करुन खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून रेहमने केलेल्या आरोपामुळे आगामी निवडणुकीत इमरान यांना फटका बसण्याची शक्यता आहे.