Dunki : "डंकीची कमाई आणि मिचेल स्टार्कच्या लिलावाच्या किंमतीत किती फरक असेल?" चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 11:30 AM2023-12-21T11:30:35+5:302023-12-21T11:31:20+5:30

'डंकी' सिनेमाच्या निमित्ताने शाहरुखने ट्वीटरवर asksrk सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तरं दिली.

shah rukh khan reply to fan who asked about difference between dunki movie collection and mitchell starc auction price | Dunki : "डंकीची कमाई आणि मिचेल स्टार्कच्या लिलावाच्या किंमतीत किती फरक असेल?" चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

Dunki : "डंकीची कमाई आणि मिचेल स्टार्कच्या लिलावाच्या किंमतीत किती फरक असेल?" चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

बहुप्रतीक्षित बिग बजेट असलेला शाहरुख खानचा 'डंकी' आज अखेर सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पठाण, जवाननंतर शाहरुखच्या 'डंकी'साठी चाहते उत्सुक होते. किंग खानने 'डंकी' सिनेमाचं जोरदार प्रमोशनही केलं होतं. 'डंकी' सिनेमाच्या निमित्ताने शाहरुखने ट्वीटरवर asksrk सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तरं दिली. अशाच एका अवलिया चाहत्याला दिलेल्या उत्तराने शाहरुखने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

नुकतंच आयपीएल २०२४साठीही ऑक्शन पार पडलं. यामध्ये शाहरुखची टीम कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केलं. त्यामुळे स्टार्क हा आयपीएलमधील सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. एका चाहत्याने शाहरुखला डंकीची कमाई आणि मिचेल स्टार्क याबाबत प्रश्न विचारला. "डंकीचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन आणि मिचेल स्टार्कच्या ऑक्शनच्या किंमतीत किती फरक असेल?" असा प्रश्न शाहरुखला चाहत्याने विचारला. 

चाहत्याच्या या प्रश्नाचं शाहरुखने मिश्किल पद्धतीने उत्तर दिलं. "हा पण काय प्रश्न आहे का भाऊ?" असं उत्तर दिलं आहे. शाहरुखच्या या हटके उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमात शाहरुख हार्डी हे पात्र साकारताना दिसणार आहे. या सिनेमात शाहरुखबरोबर विकी कौशल, तापसी पन्नू, विक्रम कोचर, बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून १५ कोटींची कमाई केली आहे. 

Web Title: shah rukh khan reply to fan who asked about difference between dunki movie collection and mitchell starc auction price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.