Shah Rukh Khan: “आर्यन कधीच अभिनेता बनू शकत नाही...”, खुद्द शाहरूखने केलेला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 06:33 PM2023-04-12T18:33:57+5:302023-04-12T18:35:08+5:30
Shah Rukh Khan On Aryan Khan: सोशल मीडियावर शाहरूखची एक जुनी मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीत शाहरूख आर्यनबद्दल बोलतोय.
Shah Rukh Khan On Aryan Khan: बाॅलिवूडच्या अनेक स्टार्सची मुलं हिरो हिरोईन झालेत. पण आर्यन खान याला अपवाद म्हणायला हवा. शाहरूख हे बॉलिवूडचं मोठ नाव. अगदी शाहरूख म्हणजे किंगखान. शाहरूखचा मुलगा आर्यन हाही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हिरो होईल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण शाहरूखच्या लेकानं हिरो बनायला स्पष्ट नकार दिला. खरं तर शाहरूखने खूप आधीच आर्यन कधीच अभिनेता बनणार नसल्याचं सांगितलं होतं.
सध्या सोशल मीडियावर शाहरूखची एक जुनी मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीत शाहरूख आर्यनबद्दल बोलतोय. माझा मुलगा कधीच बनू शकणार नाही, असं तो म्हणताना दिसतोय.
काय म्हणाला होता शाहरूख...
माझा मुलगा आर्यनला अभिनेता व्हायचं नाही आणि मला वाटतं तो कधीच अभिनेता बनू शकणार नाही. भारतात वडील अभिनेता असेल तर मुलगाही अभिनेता होतो. आर्यन उंच आहे, देखणा आहे पण मुव्ही स्टार होण्यासाठी आवश्यक ते त्याच्याकडे आहे, असं मला वाटत नाही. विशेष म्हणजे, त्याला स्वत:ला याची जाणीव आहे. पण हो, तो खूप चांगला लेखक आहे, असं शाहरूख म्हणाला होता.
तू अभिनेता होऊ शकत नाहीस, हे तू तुझ्या मुलाला सांगितलं आहेस का?असं विचारलं असता शाहरूख म्हणाला होता की, मला तर त्यानेच जाणीव करून दिली. एकदिवस तो माझ्याकडे आला आणि त्याने मला अभिनयात अजिबात रस नसल्याचं सांगितलं. त्याने दिलेली कारणं खूपच प्रामाणिक आणि व्यावहारिक होती. प्रत्येकवेळी त्याची तुलना होईल, हे त्याला माहित आहे आणि त्याला तेच नकोय.
मीडिया रिपोर्टनुसार, करण जोहर (Karan Johar ) आर्यनला लॉन्च करण्यासाठी उत्सुक होता. अजूनही आहे. आर्यनला करणने लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलंय. आर्यन मोठा झाल्यावर मीच त्याला लॉन्च करणार, असं करणने शाहरूख व गौरीलाही सांगून ठेवलं होतं. पण आता आर्यनने करणची ही ऑफर धुडकावूल लावल्याचं कळतंय. करण त्याच्या होकाराची वाट बघतोय. पण आर्यन आपल्या मतावर ठाम आहे.
केवळ करणच नाही तर झोया अख्तर ( Zoya Akhtar ) हिनेही आपल्या ‘द आर्चीज’साठी आर्यनला निवडलं होतं. पण आर्यनने तिलाही नकार कळवला. आर्यन हुबेहुब शाहरूखसारखा दिसतो. त्याला कॅमेऱ्याची भीती नाही. पण मुळातच त्याला अॅक्टिंगमध्ये इंटरेस्ट नाही. आर्यनला अभिनेता नाही तर लेखक- दिग्दर्शक बनण्यात रस आहे.