मुलगी सुहानाचा पिच्छा पुरविणाऱ्या फोटोग्राफर्सविषयी अखेर शाहरूख खान बोलला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 01:41 PM2017-07-20T13:41:16+5:302017-07-20T19:12:42+5:30
सुहानाला बघताच काही मीडियावाल्यांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मीडियाचे कॅमेरे बघितल्यानंतर सुहाना खूपच घाबरून गेली होती. तिच्या चेहºयावरील भीती स्पष्टपणे दिसत होती.
क ही दिवसांपूर्वीच शाहरूख खानची लाडकी सुहाना खान आपल्या मित्रांसोबत ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बघण्यासाठी गेली होती. मात्र सुहानाला बघताच काही मीडियावाल्यांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मीडियाचे कॅमेरे बघितल्यानंतर सुहाना खूपच घाबरून गेली होती. तिच्या चेहºयावरील भीती स्पष्टपणे दिसत होती. मात्र फोटोग्राफर्स तिची एक झलक टिपण्यासाठी आटापिटा करीत होता. तिचा पाठलाग करीत होता. अखेर सुहानाने एका लिफ्टचा आधार घेतला. परंतु त्याठिकाणीही फोटोग्राफर्स पोहोचले. सुहानाची इच्छा नसतानाही फोटोग्राफर्स तिचे फोटो काढत होते. यामुळे सुहाना खूपच अनकम्फर्टेबल असल्याचे दिसून येत होती. पुढे हा सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओला यू-ट्यूबवर तर प्रचंड हिट मिळाल्या होत्या. आता या व्हिडीओ प्रकरणावर पप्पा शाहरूख खानने चुप्पी तोडली असून, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत राजीव मसंदने शाहरूखला त्याच्या स्टारडमचा परिणाम त्याच्या मुलांवर तर होत नाही ना? मीडियावाले जेव्हा तुझ्या मुलांचा पिच्छा पुरवितात तेव्हा एक पॅरेंट म्हणून तू अपसेट होतो काय? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना शाहरूखने म्हटले की, हा स्टारडमचा मुद्दा आहे. आम्ही सगळ्यांनीच या स्टारडमचा स्वीकार केला आहे. मात्र माझ्या मुलांना हे स्टारडम नकोशे झाले आहे. त्यामुळेच जेव्हा-केव्हा मी लोकांमध्ये जातो तेव्हा मी मुलांना सोबत घेऊन जाणे टाळतो. माझी पत्नी माझ्यासोबत येत नाही. आता तर मुलांनीही येणे बंद केले. त्यामुळे बºयाच फंक्शनमध्ये मला एकट्यालाच जावे लागते.
पुढे बोलताना किंग खानने म्हटले की, माझी मुले आता खूप मॅच्युअर झाली आहेत. ते मला वेळोवेळी सल्ला देत असतात. बºयाचदा मीडियाविषयी बोलताना ते म्हणतात की, पप्पा तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कारण त्याठिकाणी बरेचसे लोक असतात. अशावेळी मी मुलांना सांगतो की, तुम्ही देखील माध्यमांचा सामना करताना संयम ठेवा. जर कोणी फोटोग्राफर्स तुमचे फोटो घेत असेल तर ते घेऊ द्या, आणि नम्रपणे आता मी जावू शकतो किंवा शकते काय? असे त्यांना विचारा. गेल्या २५ वर्षांपासून मी हेच करत आल्याचे शाहरूखने स्पष्ट केले. सध्या शाहरूख त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या त्याने एक मिनी ब्रेक घेतला आहे. तो लॉस एंजिलिस येथे सुट्या एन्जॉय करीत आहे.