Pathaan Viral Video: आपली जागा घेणार कोण? शाहरूख-सलमानला पडलाय प्रश्न, तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:28 PM2023-01-31T16:28:43+5:302023-01-31T16:29:10+5:30

Pathaan Viral Video: सध्या सगळीकडे 'पठाण' आणि शाहरूख सलमानचीच चर्चा रंगली आहे. याचदरम्यान दोघांनी सिनेमातील एक क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.

shah rukh khan salman khan viral video from pathaan BOLLYWOOD | Pathaan Viral Video: आपली जागा घेणार कोण? शाहरूख-सलमानला पडलाय प्रश्न, तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

Pathaan Viral Video: आपली जागा घेणार कोण? शाहरूख-सलमानला पडलाय प्रश्न, तुफान व्हायरल होतोय हा VIDEO

googlenewsNext

Shahrukh Khan & Salman Khan Viral Video: 'पठाण' (Pathaan ) रिलीज झाला आणि शाहरूख खानचे चाहते सुखावले. सलमान खानच्या चाहत्यांनाही आनंद झाला. 'पठाण'मध्ये भाईजानचा कॅमिओ आहे. भाईजान अगदी काही मिनिटांसाठी चित्रपटात दिसतो. पण शाहरूखसोबत मिळून तो अगदी माहौल करतो. सध्या सगळीकडे 'पठाण' आणि शाहरूख सलमानचीच चर्चा रंगली आहे. याचदरम्यान दोघांनी सिनेमातील एक क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. या क्लिपमध्ये शाहरूख व सलमान दोघही मालगाडीच्या डब्यावर बसून आपल्या उत्तराधिकार्याबद्दल चर्चा करताना दिसतात.

मालगाडीच्या डब्ब्यावर बसून शाहरुख सलमानला म्हणतो की, ''मी कधी कधी विचार करतो..३० वर्ष झाली..आता सोडून द्यायला हवं'' . यावर सलमान म्हणतो,''पण आपली जागा कोण घेणार?''. यावर ''अरे तो आहे ना...'', असं शाहरूख म्हणतो. मात्र सलमान नकारात्मक मान हलवतो. मग सलमान खान म्हणताना दिसतो की, ''तो दुसरा आहे ना एक,त्याच्यात दम आहे''. पण यावेळी शाहरुख त्यावर नकारार्थी मान हवलतो आणि म्हणतो,''नाही यार...तो नाही..त्याच्यात खास काय आहे असं''. यानंतर दोघंही विचार करायला लागतात...
पण दोघांना एकही नाव सुचत नाही. अखेर ''आपल्यालाच करावं लागेल भावा..देशाचा प्रश्न आहे शेवटी,मुलांवर नाही सोडू शकत सगळं..चल निघूया..,''असं शाहरूख म्हणतो.

ही क्लिप 'पठाण' चित्रपटातील आहे. क्लिपमध्ये दोघंही रॉ(RAW) सोडून देण्याबद्दल बोलत आहेत. पण दोघंही ज्या पद्धतीच्या खाणाखुणा करतात, त्यावरून ही चर्चा रॉबद्दल नसून बॉलिवूडमध्ये त्यांची जागा कोण घेणार? याबद्दल असल्याचं चाहते मानत आहेत. आपला उत्तराधिकारी कोण?असा प्रश्न दोघांनाही पडला आहे. पण कदाचित त्यांच्याकडेही याचं उत्तर नाहीये. ३० वर्षांपासून अधिक काळापासून शाहरूख व सलमान बॉलिवूडमध्ये आहेत. आजही त्यांची जागा कुणीच हिरावून घेऊ शकलेलं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक तरूण अभिनेते सक्रीय आहेत. पण शाहरूख व सलमान यांचं सुपरस्टारपद आजही अबाधित आहे.

Web Title: shah rukh khan salman khan viral video from pathaan BOLLYWOOD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.