'माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत; शाहरुखच्या वक्तव्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:23 AM2021-09-07T11:23:04+5:302021-09-07T11:24:45+5:30

Shah rukh khan : किंग खान त्याच्या मुलांच्या बाबतीत बोलणं बऱ्याचदा टाळतो. परंतु, यावेळी त्याने आर्यनविषयी केलेलं वक्तव्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

shah rukh khan shocking statement for son aryan take drugs in young age | 'माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत; शाहरुखच्या वक्तव्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

'माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत; शाहरुखच्या वक्तव्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देशाहरुखने आर्यनविषयी केलेलं वक्तव्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अभिनेता शाहरुख खान कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या कुटुंबीयांमुळे. मात्र, यावेळी शाहरुख कोणत्याही चित्रपटासाठी किंवा कुटुंबासाठी नव्हे तर त्याच्याच एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.  किंग खान त्याच्या मुलांच्या बाबतीत खूप पझेसिव्ह आहे त्यामुळे बऱ्याचदा तो त्याच्या मुलांच्या बाबतीत बोलणं टाळतो. परंतु, यावेळी त्याने आर्यनविषयी केलेलं वक्तव्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "माझ्या मुलाने ती सगळी वाईट कामं करावीत जी मी माझ्या तरुणपणात केली नाहीत", असं वक्तव्य शाहरुखने केलं आहे.  १९९७ मध्ये शाहरुखने सिमी ग्रेवाल यांच्या टॉक शोमध्ये हे वक्तव्य केलं होतं. मात्र, त्याची चर्चा आता पुन्हा एकदा नव्याने रंगू लागली आहे.

शाहरुखच्या मुलाचा आर्यनचा ज्यावेळी जन्म झाला होता त्यावेळी शाहरुख आणि गौरी या दोघांनी सिमी ग्रेवाल यांच्या टॉक शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुखच्या मुलाविषयी सिमी यांनी काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तर देताना शाहरुखने मुलाने सगळ्या वाईट गोष्टी एकदा तरी ट्राय कराव्यात असं म्हटलं होतं.

सहा महिन्यानंतर अबराम चाहत्यांसमोर; 'या' कारणामुळे कॅमेरापासून असतो दूर

"मी माझ्या तरुणपणात जे केलं नाही ते सगळं माझ्या मुलाने करावं. मुलींना इंप्रेस करावं,  ड्रग्स, सेक्स या सगळ्या गोष्टी अनुभवाव्यात. माझी एक इच्छा आहे त्याने मुलींना असा त्रास द्यावा ज्यामुळे त्यांचे पालक माझ्याकडे तक्रार घेऊन येतील", असं शाहरुख म्हणाला होता. मात्र, शाहरुख हे केवळ विनोदाने म्हणाला होता.

दरम्यान, शाहरुखचा लाडका लेक आर्यन प्रकाशझोतापासून कायमच लांब असतो. अलिकडेच त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असून चाहते त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: shah rukh khan shocking statement for son aryan take drugs in young age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.