राजकुमार हिरानीचे हे दोन चित्रपट किंग खानने केले होते रिजेक्ट, आजही अभिनेत्याला होता पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:24 PM2023-11-03T12:24:45+5:302023-11-03T12:27:53+5:30

नुकताच शाहरुख खानने हा खुलासा केला.

Shah rukh khan spoke about rejecting rajkumar hirani movie munnabhai mbbs and 3 idiots dunki director revealed previous plans of collaborating with srk | राजकुमार हिरानीचे हे दोन चित्रपट किंग खानने केले होते रिजेक्ट, आजही अभिनेत्याला होता पश्चाताप

राजकुमार हिरानीचे हे दोन चित्रपट किंग खानने केले होते रिजेक्ट, आजही अभिनेत्याला होता पश्चाताप

शाहरुख खानच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना दुहेरी ट्रीट दिली. मुंबईतील घराबाहेर स्वतःची झलक दाखवली.  यानंतर  राजकुमार हिरानी दिग्दर्शित त्याचा आगामी कॉमेडी चित्रपट 'डिंकी'चा टीझरही रिलीज झाला. 'स्पेशल मीट' कार्यक्रमादरम्यान, राजकुमार हिरानी यांनी खुलासा केला की त्यांना शाहरुख खानला त्यांच्या पहिल्या चित्रपटात कास्ट करायचे होते. 

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त राजकुमार हिरानी यांनी अनेक रंजक खुलासे केले. यादरम्यान चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांनी सांगितले की, जेव्हा ते एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होते, तेव्हा त्यांनी शाहरुखला त्यांच्या पहिल्या चित्रपटात कास्ट करण्याचा विचार केला. ते म्हणाले, 'मी एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचो आणि इथून मी पदवीधर झालोय यावर माझा विश्वासच बसत नव्हता, पण माझ्यासोबत कोण काम करेल?' मी बच्चन साहेबांसारख्या बड्या स्टार्सकडे बघायचो आणि विचार करायचो, त्यांच्यासारखा स्टार्स माझ्यासोबत काम का करतील?

समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये हिरानी असे म्हणताना दिसत आहेत की, शाहरुखचा टीव्ही शो सर्कस पाहिल्यानंतर ही कल्पना त्यांना सुचली होती. ते म्हणाले, 'एके दिवशी माझ्या हॉस्टेलच्या टीव्ही रूममध्ये मी सर्कस पाहत होतो. एक तरुण अभिनेता स्टेजवर परफॉर्म करत होता. मला वाटलं, 'कोण आहे हा मुलगा?' हे खूप चांगला अभिनय करतो. तो काही मोठा स्टार  नाही. मी ग्रॅज्युएट झाल्यावर त्याला माझ्या चित्रपटात कास्ट करू शकतो.

यावर शाहरुख म्हणतो, 'माझ्यासोबतही असेच घडले, जेव्हा हिरानानी मला मुन्ना भाईबाबत सांगत होते. मी म्हणालो नवीन डायरेक्टर असेल तर तो नक्की करेल, मी म्हणालो की  6-8 महिन्यांनंतर करुया तर हे निघून गेले. जेव्हा ते 3 इडियट्ससाठी घेऊन आले तेव्हा मी म्हणाला, आता मी मोठा झालोय. पण कोविडच्या काळात मी ठरवलं आता आलेली संधी सोडायची नाही. मी त्यांना इतर हिरोना देखील भेटू दिलं नाही. 

Web Title: Shah rukh khan spoke about rejecting rajkumar hirani movie munnabhai mbbs and 3 idiots dunki director revealed previous plans of collaborating with srk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.