अडीच वर्षांत ३ कोटींचं प्रॉफिट! गौरी खानचं 'प्रॉपर्टी डील' आलं समोर, 'कोहिनूर'मधील फ्लॅटने खाल्ला 'भाव'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:31 IST2025-04-01T17:31:04+5:302025-04-01T17:31:31+5:30
८.५ कोटी रुपयांना गौरीने दादरमधील प्राइम लोकेशनवर असलेला हा फ्लॅट खरेदी केला होता. आता अडीच वर्षांनी काही कारणांमुळे हा फ्लॅट तिला विकावा लागला आहे. मात्र हा फ्लॅट विकून शाहरुखची पत्नी मालामाल झाली आहे.

अडीच वर्षांत ३ कोटींचं प्रॉफिट! गौरी खानचं 'प्रॉपर्टी डील' आलं समोर, 'कोहिनूर'मधील फ्लॅटने खाल्ला 'भाव'
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान मन्नत सोडून त्याच्या कुटुंबींयासह भाड्याच्या घरात राहत आहे. अशातच आता शाहरुखची पत्नी गौरी हिने मुंबईतील लक्झरी प्रॉपर्टी विकल्याचं समोर आलं आहे. ही प्रॉपर्टी विकून गौरीने कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवला आहे.
गौरीने मुंबईतील दादर परिसरातील घर विकलं आहे. दादरमधील कोहिनूर या बिल्डिंगमध्ये गौरीने २०२२ मध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटसोबत तिने दोन कार पार्किंगची जागाही विकत घेतली होती. ८.५ कोटी रुपयांना गौरीने दादरमधील प्राइम लोकेशनवर असलेला हा फ्लॅट खरेदी केला होता. आता अडीच वर्षांनी काही कारणांमुळे हा फ्लॅट तिला विकावा लागला आहे. मात्र हा फ्लॅट विकून शाहरुखची पत्नी मालामाल झाली आहे.
गौरीने हा फ्लॅट ११.६१ कोटींना विकला असून अवघ्या अडीच वर्षांतच दादरमधील या प्रॉपर्टीने तिला तब्बल ३ कोटींचं प्रॉफिट मिळवून दिलं आहे. हा फ्लॅट विकून गौरीला ३७ टक्क्यांचा नफा मिळाला आहे. शाहरुखची पत्नी गौरी ही एक इंटेरियर डिझायनर आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरांचं इंटेरियर गौरी खानने केलं आहे. सिद्धार्थ-कियाराच्या नव्या घराचं इंटेरियरही गौरीच करत आहे.