वाढदिवशी शाहरुख खान करणार ही मोठी घोषणा? 'जन्नत'वर होणार जंगी सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:45 IST2024-10-30T16:44:10+5:302024-10-30T16:45:25+5:30
शाहरुख खान त्याच्या वाढदिवशी जंगी सेलिब्रेशन करणार असून एक मोठी घोषणाही करणार आहे (shahrukh khan)

वाढदिवशी शाहरुख खान करणार ही मोठी घोषणा? 'जन्नत'वर होणार जंगी सेलिब्रेशन
शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. शाहरुखला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. शाहरुखने २०२३ ला पठाण, जवान, डंकी या तीन सुपरहिट सिनेमांमधून लोकांच्या मनावर चांगलंच राज्य केलं. शाहरुख लवकरच त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने शाहरुख एक मोठी घोषणा करणार आहे. त्यामुळे शाहरुखच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं सरप्राइज मिळणार आहे.
शाहरुख वाढदिवशी करणार मोठी घोषणा
शाहरुख खान वाढदिवशी मोठी घोषणा करणार आहे. त्यापैकी एक मोठी गोष्ट म्हणजे शाहरुख खान त्याच्या आगामी 'किंग' सिनेमाची अधिकृत घोषणा करणार आहे. शाहरुख त्याच्याा वाढदिवशी अर्थात २ नोव्हेंबरला 'किंग' सिनेमाचं पोस्टर किंवा सिनेमाच्या मोशन पोस्टर रिलीज करणार आहे. या सिनेमात शाहरुख खानसोबत त्याची लाडकी लेक सुहाना मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
शाहरुखच्या वाढदिवसाला सेलिब्रिटींची मांदियाळी
शाहरुखचा वाढदिवस २ नोव्हेंबरला आहे. शाहरुखचा ५९ वा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाला २५० लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. रणवीर सिंग, सैफ अली खान, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, एटली, जोया अख्तर, फराह खान, करण जौहर, अनन्या पांडे, आलिया भट हे कलाकार सहभागी होणार आहेत. शाहरुख सर्वांसाठी जंगी पार्टी आयोजित करणार आहे. त्यामुळे शाहरुखचा यंदाचा वाढदिवस चांगला असणार यात शंका नाही.