शाहरूख खान पुन्हा एकदा दिसणार 'डॉन'च्या भूमिकेत, सुहानाची सिनेमात लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 14:32 IST2024-04-24T14:32:35+5:302024-04-24T14:32:58+5:30
Shah Rukh Khan : डॉनची फ्रंचाइजी सोडल्यानंतर आता शाहरूख खान त्याची लाडकी लेक सुहाना खानसोबत द किंगमध्ये दिसणार आहे. सुजॉय घोषच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख खान निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.

शाहरूख खान पुन्हा एकदा दिसणार 'डॉन'च्या भूमिकेत, सुहानाची सिनेमात लागली वर्णी
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान(Shah Rukh Khan)ने २०२३ साली रुपेरी पडद्यावर कमबॅक केले आहे. २०२३ साली त्याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात पठाण, जवान आणि डंकी या सिनेमाचा समावेश आहे. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस दमदार कमाई केली होती. आता तो डॉनच्या अवतारात परतणार आहे. एकीकडे शाहरूख खानने डॉन फ्रंचाइजी सोडली आहे तर आता त्याला पुन्हा एकदा डॉन बनण्याची संधी मिळाली आहे.
शाहरूख खान डॉन फ्रंचाइजीमधला तिसरा सीक्वलचा हिस्सा नाही. आता रणवीर सिंग डॉनची भूमिका साकारणार आहे. डॉनची फ्रंचाइजी सोडल्यानंतर आता शाहरूख खान त्याची लाडकी लेक सुहाना खानसोबत द किंगमध्ये दिसणार आहे. सुजॉय घोषच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख खान निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.
२०० कोटींमध्ये बनणार सिनेमा
द किंग चित्रपटात शाहरूख खान केमिओ करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता तो या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. द किंग हा सुहाना खानची मोठ्या स्क्रीनवरील पहिला चित्रपट असेल. यापूर्वी सुहानाचा द आर्चीज रिलीज झाला होता जो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारीत झाला होता. द किंग चित्रपटात गुरू आणि शिष्याची कथा रेखाटण्यात आली आहे. २०० कोटींच्या बजेटमध्ये बनत असलेल्या चित्रपटात ती अॅक्शन अवतारात दिसणार आहे. त्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.
सिनेमात असा असेल शाहरूख खानचा लूक
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार शाहरूख खान प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो आहे आणि लोकांना त्याला ग्रे शेडमध्ये पाहायचे आहे. द किंगमध्ये तो सिद्धार्थ आनंद आणि सुजॉय घोषसोबत दिसणार आहेत. द किंगमधील शाहरुख खानच्या लूकबद्दल सांगायचे तर तो मोठे केस आणि थोडी दाढी अशा अंदाजात दिसणार आहे.