बाबो! ‘मन्नत’च्या नव्या नेमप्लेटवर शाहरूख खाननं किती खर्च केला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:59 PM2022-04-26T14:59:57+5:302022-04-26T15:00:29+5:30
Shah Rukh Khan's new Mannat nameplate : होय, ‘मन्नत’ ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेक वर्षांनी शाहरूखने घराला नवी पाटी लावली आणि ‘मन्नत’ ट्विटरवर ट्रेंड करू लागलं.
Shah Rukh Khan's new Mannat Nameplate is Worth : गेल्या काही दिवसांपासून किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) सतत चर्चेत आहे आणि का नसावा? जवळपास तीन वर्षानंतर किंगखान पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. त्याचा पठाण हा सिनेमा येतोय. राजकुमार हिराणींच्या ‘डंकी’या चित्रपटात तो झळकणार आहे. इतकंच नाही तर किंगखानच्या मन्नत (Mannat) या बंगल्यावरची नावाची पाटी सुद्धा बदललीये. आता ही नावाची पाटी मध्येच कुठून आली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सध्या सोशल मीडियावर याचीच हवा आहे.
होय, ‘मन्नत’ ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेक वर्षांनी शाहरूखने घराला नवी पाटी लावली आणि ‘मन्नत’ ट्विटरवर ट्रेंड करू लागलं. त्याच्या घराच्या पाटीचे एक ना अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बंगल्याच्या या नव्या पाटीवर किंगखानने किती रूपये खर्च केले माहितीये? तर लाखो.
Nameplates change hote rehenge, emotions nhi...#Mannatpic.twitter.com/VoizpsJ9nR
— PŔØFÉŠŠØŔ ⚪ (@Myself_Prince_) April 23, 2022
होय, ‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, या नेमप्लेची किंमत 20 ते 25 लाख रूपये आहे. शाहरूखची पत्नी गौरी खान ही स्वत: एक इंटीरिअर डिझाइनर आहे. तिच्याच एक्सपर्ट सुपरव्हिजनमध्ये ही पाटी तयार केली गेली म्हणे. गौरीला काहीतरी क्लासी हवं होतं. खान फॅमिलीच्या स्टँडर्डला साजेसं तिला हवं होतं. मग, पैशाकडे कोण पाहतो? याचमुळे या नेमप्लेटवर 20 ते 25 लाख खर्च केले गेलेत.
Lgta Hai Fir Se #Mannat Ka Bulava Aane Wala Hai ..........#Mannat (Symbol of Love, Stardom, Feeling , Passion and Unconditional Love)#ShahRukhKhan𓀠#Dunki
— Anil SRK (@IamAnilSRK) April 23, 2022
We Love You Shah Sir @iamsrk
This name plate is ....waaao💥❣️ pic.twitter.com/TpeMlkJU8A
गुजराती व्यक्तीचा होता हा बंगला
मुंबईतील अनेक दिग्गज कलाकारांच्या आलिशान बंगल्यांमध्ये ‘मन्नत’चा समावेश केला जातो. या बंगल्याला मुंबईतील आयकॉनिक प्लेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. स्ट्रगल काळात किंग खान कित्येक वेळा या बंगल्याबाहेर उभा राहून स्वत:चे फोटो काढायचा. 1997 मध्ये ‘यस बॉस’ या चित्रपटावेळी शाहरुखने पहिल्यांदाच ‘मन्नत’आतून पाहिला होता. त्याचवेळी आयुष्यात हा बंगला विकत घेणार असा निश्चय त्याने केला. आणि ते करुन सुद्धा दाखवलं.
शाहरुखने ‘मन्नत’ची खरेदी करण्यापूर्वी नरिमन दुबास या गुजराती व्यवसायिकाचं हे घर होतं. मात्र, नरिमन यांनी हा बंगला शाहरुखला विकला. त्यावेळी शाहरुखने 13 कोटींमध्ये या घराची खरेदी केली होती. आज या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आज ‘मन्नत’ या नावाने ओळखलं जाणारं शाहरुखचं घर पूर्वी विला विएना या नावाने ओळखलं जायचं. हे या घराचं पहिलं नाव होतं. शाहरुखने या बंगल्याची खरेदी केल्यावर त्याचं नाव ‘मन्नत’ असं ठेवलं.