Tiger 3: भाईजानच्या 'टायगर 3'ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी, ‘पठाण’ला टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 05:41 PM2023-02-06T17:41:25+5:302023-02-06T17:44:52+5:30
Tiger 3: 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमानचे चाहते 'टायगर 3'ची ( Tiger 3) आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे.
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) नुकताच रिलीज झालेला ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा छप्परफाड कमाई करतोय. ‘पठाण’मध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याचाही कॅमिओ रोल आहे. ‘पठाण’नंतर आता चर्चा आहे ती सलमानच्या 'टायगर 3' या आगामी सिनेमाची. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमानचे चाहते 'टायगर 3'ची ( Tiger 3) आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. 'टायगर 3'चे राईट्स कोट्यवधी रूपयांत विकले गेले आहेत.
'टायगर 3' रिलीज व्हायला बराच वेळ आहे. मात्र प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे. चर्चा खरी मानाल तर ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने तब्बल 200 कोटी रुपयांना या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे सलमान आणि कतरिनाच्या या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच 200 कोटी कमावले आहेत.
सलमान आणि कतरिना स्टारर 'एक था टायगर' या चित्रपटाचा पहिला भाग 2012मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाच्या पाच वर्षानंतर म्हणजेच 2017मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘एक था टायगर’च्या 10 वर्षांनंतर चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पठाण’साठी मोजले 100 कोटी
‘पठाण’ हा सिनेमा गेल्या 25 डिसेंबरला रिलीज झाला. चित्रपटाला थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. भारतात या सिनेमाने 400 कोटींवर कमाई केली आहे. विदेशातील कमाईचा आकडा 800 कोटींवर गेला आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने तब्बल 100 कोटी रुपये मोजून पठाणचे ओटीटी हक्क विकत घेतल्याचं कळतंय.
ब्रह्मास्त्रसाठी 80 कोटी
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला प्रदर्शित होऊन बराच काळ झाला. या चित्रपटानेही दमदार कमाई केली होती. डिस्ने प्लस हॉटस्टार या प्लॅटफॉर्मने 80 कोटी रुपये मोजून ब्रह्मास्त्रचे ओटीटी हक्क विकत घेतले आहेत.