शाहरुख खानच्या ‘रईस’चा असादेखील ‘मॅशअप’ विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2017 01:24 PM2017-01-07T13:24:14+5:302017-01-07T13:24:14+5:30
शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाच्या ट्रेलरचे बॅटमॅन-जोकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनल मेस्सी, नोटबंदी असे अनेक मॅश-अप व्हिडिओज सध्या व्हायरल होत आहेत. सर्वाधिक मॅश-अप बनवले गेलेले ट्रेलर म्हणून अनोखा विक्रम त्याच्या नावे नोंदवला गेला आहे. याविषयी अधिक वाचा....
ल कांना एखादी गोष्ट आवडली की ते कल्पनाशक्ती वापरून त्याचा संबंध नानाविध गोष्टींशी लावतात. मूळ गोष्टीला स्वत:च्या क्रिएटिव्हिटीचा तडका मारत काही तरी इनोव्हेटिव्ह आणि नवीन व्हर्जन तयार करून ती गोष्ट अधिक रंजक बनवली जाते. त्याला मॅश-अप असे म्हणतात.
याचा प्रत्यय सध्या ‘रईस’च्या ट्रेलरचे केले जाणारे अनेक मॅश-अप व्हिडिओज् पाहून येतोय. किंग खान शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. इंटरनेटवर चित्रपटाचा ट्रेलर दाखल झाल्यापासून आतापर्यंत चाहत्यांनी त्याचे बॅटमॅन-जोकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनल मेस्सी, नोटबंदी अशा विविध प्रकारे मॅश-अप करण्यात आले.
‘रईस’चे मॅश-अप ट्रेलर लोकांना खूप आवडत असून इंटरनेटवर सध्या ते प्रचंड व्हायरल होत आहे. ट्रेलरची जादू लोकांवर एवढी चढली आहे की देशाविदेशातील लोक त्याचे मॅश-अप बनवत आहेत. रईसचे डायलॉग कोहली, धोनी, रोनाल्डो, मेस्सीच्या तोंडून ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित होऊन जाल. एवढेच नाही तर सध्या गाजत असलेल्या नोटबंदीचा मुद्दा घेऊनही मॅश-अप तयार केलेले आहे.
म्हणून तर बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मॅश-अप झालेले ट्रेलर म्हणून ‘रईस’च्या नावे अनोखा विक्रम झाला आहे. सोशल मीडिया आणि पॉप कल्चरचा वाढता प्रभाव पाहता नेट जगतामध्ये मॅश-अप व्हिडिओज् खूप प्रसिद्ध आहेत. ट्रेंडिंग घटनांवर असे मॅश-अप व्हिडिओज् बनवले जातात. पहिल्या तीन दिवसांतच सर्वाधिक वेळा पाहिले गेलेले ट्रेलर म्हणून ‘रईस’ने बाजी मारली होती.
येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, नवाजुद्दिन सिद्दीकी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख ऐंशीच्या दशकातील रईस आलम नावाच्या स्मगलरची भूमिका साकारत आहे.