भाई मन्नतमध्ये पाल येते का? चाहत्याने विचारलेल्या विचित्र प्रश्नावर शाहरुख खानचं हटके उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 03:17 PM2023-09-23T15:17:23+5:302023-09-23T15:23:53+5:30

एका चाहत्याने शाहरुखला मन्नतमध्ये पाल येते का, असा प्रश्न विचारला. यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिलं.

Shah Rukh Khan's response to a strange question asked by a fan | भाई मन्नतमध्ये पाल येते का? चाहत्याने विचारलेल्या विचित्र प्रश्नावर शाहरुख खानचं हटके उत्तर

Shahrukh Khan

googlenewsNext

बॉलिवूडचा बादशहा अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा चाहता वर्ग भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. शाहरुख खानने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांसाठी 'आस्क एसआरके' हे सेशन ठेवले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांनी शाहरुखला काही भन्नाट प्रश्न विचारले, ज्यांना शाहरुखने मजेशीर उत्तरे दिली.  एका चाहत्याने शाहरुखला मन्नतमध्ये पाल येते का, असा प्रश्न विचारला. यावर शाहरुखने काय उत्तर दिले, चला जाणून घेऊया.

किंग खानने ट्विट करत म्हटलं की,  ‘आज शुक्रवारची संध्याकाळी मी एकटाच आहे. त्यामुळे तुमच्यासोबत काही मिनिटं घालवण्याचा विचार केलाय. यानंतर मला जवान हा चित्रपट पहायला जायचं आहे’, असं म्हणत त्याने 'आस्क एसआरके' सेशनची सुरुवात केली. यावेळी एका नेटकऱ्याने शाहरुखला  ‘मन्नतमध्ये पाल येतात का?’ असा विचित्र प्रश्न विचारला.  त्यावर शाहरुखने उत्तर दिले की, ‘पाल तर नाही पाहिली. पण सुंदर-सुंदर फुलपाखरू खूप येतात. त्यांना फुलांवर बसलेलं पाहून लहान मुलांना खूप आवडतं’.

आणखी एका युजरने शाहरुखला म्हटलं, 'बेटी को हाथ लगाने से पहले माँ से बात कर'. त्यावर शाहरुख म्हणाला ‘‘माँ तो बात भी नहीं करती. ऐसे ही सीधा कर देगी अगर बच्चो का हाथ लगाया तो’.

शाहरुख खान याने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. शाहरुख खान याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. शाहरुख खान याची काही दिवसांपूर्वीच जवान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने धमाका केला. विशेष म्हणजे शाहरुख खान जवान या चित्रपटाची हवा फक्त भारतामध्येच नव्हे तर विदेशात देखील बघायला मिळतंय. आता जवाननंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Web Title: Shah Rukh Khan's response to a strange question asked by a fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.