तुमचा विश्वास बसणार नाही पण, कमल हासनकडे ‘तेव्हा’ शाहरूखला द्यायला पैसे नव्हते!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 08:00 AM2022-06-15T08:00:00+5:302022-06-15T08:00:07+5:30

Kamal Haasan : ‘विक्रम’च्या दिग्दर्शकाला कमल हासन यांनी नुकतीच एक लक्झरी कार भेट दिली. सूर्याला 47 लाखांचं रोलेक्स घड्याळ गिफ्ट केलं. पण एकेकाळी याच कमल हासन यांच्याकडे मानधन देण्यासाठी पैसे नव्हते...

Shah Rukh Khan's salary for Kamal Haasan's Hey Ram was | तुमचा विश्वास बसणार नाही पण, कमल हासनकडे ‘तेव्हा’ शाहरूखला द्यायला पैसे नव्हते!!

तुमचा विश्वास बसणार नाही पण, कमल हासनकडे ‘तेव्हा’ शाहरूखला द्यायला पैसे नव्हते!!

googlenewsNext

साऊथचा मेगास्टार कमल हासन (Kamal Haasan) सध्या जाम चर्चेत आहेत आणि चर्चा का नसावी? ‘विक्रम’ (Vikram) या त्यांच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे. फक्त 10 दिवसांत या चित्रपटाने वर्ल्डवाईड 300 कोटींची कमाई केली आहे. एकट्या तामिळनाडूत या चित्रपटाने 100 कोटी रूपये कमावले आहेत. आपल्या ‘कमबॅक’ सिनेमाला मिळत असलेला प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून कमल हासन भारावून गेले आहेत. जाम खूश्श आहेत. इतके की, ‘विक्रम’च्या दिग्दर्शकाला त्यांनी नुकतीच एक लक्झरी कार भेट दिली. अन्य 13 सहाय्यक दिग्दर्शकाला लाखो रूपये किमतीची बाईक भेट दिली. इतकंच नाही, चित्रपटात कॅमियो रोलमध्ये असलेल्या सूर्याला 47 लाखांचं रोलेक्स घड्याळ गिफ्ट केलं. ऐकून आश्चर्य वाटेल, पण  कलाकारांवर अशी बक्षिसांची बरसात करणाऱ्या कमल हासन यांच्याकडे एकेकाळी शाहरूख खानला ( Shah Rukh Khan)  मानधन देण्याइतके पैसेही नव्हते.

होय, खुद्द कमल हासन यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ‘हे राम’ या चित्रपटात शाहरूख खानने कॅमियो केला होता. पण ‘हे राम’चं बजेट संपलं होतं आणि कमल हासन यांच्याकडे शाहरूखला द्यायला पैसेच नव्हते. तेव्हा एक पैसाही न घेता शाहरूखनं या चित्रपटात काम केलं होतं. या कॅमियोच्या बदल्यात कमल हासन शाहरूखला केवळ एक मनगटी घड्याळ देऊ शकले होते. 

एका मुलाखतीत कमल हासन यांनी याबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते, ‘कुणाला ही गोष्ट खोटी वाटेल, पण हे खरं आहे. शाहरूख एक कमर्शिअल माइंडचा आर्टिस्ट आहे. मी सुद्धा कमर्शिअल आहे. ‘हे राम’साठी किती बजेट आहे हे शाहरूखला माहित होतं. त्याला केवळ माझ्यासोबत काम करायचं होतं, म्हणून त्याने या चित्रपटासाठी होकार दिला होता. चित्रपटाचं बजेट प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याचं त्याला कळलं, तेव्हा त्याने मानधन घेण्यास नकार दिला होता. मी अनेकदा त्याला मानधन घेण्याबद्दल आग्रह केला. पण त्याने नेहमीच ते टाळलं. फी म्हणून त्याने केवळ एक मनगटी घड्याळ घेतलं होतं.’
 

Web Title: Shah Rukh Khan's salary for Kamal Haasan's Hey Ram was

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.