टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:00 PM2024-07-05T12:00:17+5:302024-07-05T12:01:05+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेही खेळाडूंची Victory परेड पाहून ट्वीट केले.

Shah Rukh Khan's tweet after seeing Team India's victory parade; Told the players, 'Because of you . . .' | टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..."

टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..."

भारतीय संघ टी 20 विश्वकप जिंकून काल मायदेशी परतला. आधी दिल्ली आणि नंतर मुंबईत खेळाडूंचं जंगी स्वागत झालं. मरीन ड्राईव्हवर त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. नंतर वानखेडे स्टेडियमवर छोटा कार्यक्रम पार पडला. यावेळी लाखो क्रिकेटप्रेमी मरीन ड्राईव्ह आणि वानखेडेमध्ये एकत्र आले होते. ही गर्दी चाहत्यांचं क्रिकेटप्रेम दाखवून देणारी होती. बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेही (Shahrukh Khan)  खेळाडूंची Victory परेड पाहून ट्वीट केले.

सध्या सगळीकडूनच टीम इंडियाचं कौतुक होतंय. सर्वजण अजूनही विश्वकप जिंकल्याच्या आनंदात आहे. शाहरुख खाननेही ट्वीट करत खेळाडूंचं कौतुक केलं. तो लिहितो, "खेळाडूंना इतकं आनंदात आणि भावूक पाहून माझंही ऊर भरुन आलं. त्यांनी केलेली ही कामगिरी पाहून भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. लव्ह यू ऑल टीम इंडिया... आता रात्रभर नाचा, जल्लोष करा. बॉईज इन ब्लू टेक अवे ऑल द ब्लूज. बीसीसीआयचे, जय शाहचे आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफचेही अभिनंदन. या सर्वांनीच पडद्यामागून खूप मेहनत केली."

टीम इंडियाचा जयघोष आणखी काही काळ असाच सुरु राहणार आहे. टीम इंडियाची ही कामगिरी वर्षानुवर्ष लक्षात ठेवली जाणार आहे. शेवटी आपण वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं सिद्ध करुन आलो आहोत याचा सर्वच भारतीयांना अभिमान आहे. 

Web Title: Shah Rukh Khan's tweet after seeing Team India's victory parade; Told the players, 'Because of you . . .'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.