एकेकाळी शाहरुखची मोठी बहिण दिसायची खूप सुंदर, एका घटनेनंतर बदलेलं सर्व काही; बिघडलं मानसिक संतुलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 12:51 PM2020-12-09T12:51:07+5:302020-12-09T12:51:34+5:30
शाहरूख खानच्या स्ट्रगलच्या काळातील जवळचा मित्र, अभिनेता विवेक वासवानीने एक असा फोटो शेअर केला आहे ज्याची चर्चा होताना दिसते आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानच्या स्ट्रगलच्या काळातील जवळचा मित्र, अभिनेता आणि निर्माता विवेक वासवानीने एक असा फोटो शेअर केला आहे ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. त्याने शाहरूख खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्याची बहिण शहनाज लालारूख खानदेखील दिसते आहे. या थ्रोबॅक फोटोत शाहरूखची बहिण शहनाज लालारूख खूप सुंदर दिसते आहे. मात्र आज तिला ओळखणंदेखील कठीण झाले आहे. ती घरातून फार कमी बाहेर पडते.
विवेकने हा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात त्याने लिहिले की, बॉलिवूडच्या आधी, बॉलिवूडच्या पत्नीं यासारख्या शब्दांनी भरलेले होते. घरात डालमपालपार्क होते आणि आई होती. उत्साह आणि बिना शर्थ स्वीकृती होती. इथे शाहरूख, गौरी, लालारूख आणि मोईसोबत आई आहे.
Much before Bollywood, before terms like Bollywood wives were coined, home was DalamalPark and mom was mom! There was warmth and unconditional acceptance! Here is Mom with Shahrukh, Gauri, Lalarukh and moi! #roots#friendship#mompic.twitter.com/qQqyNrT71X
— Viveck Vaswani (@FanViveck) December 6, 2020
शाहरूखची बहिण ६१ वर्षांची आहे. लालारूखच्या जीवनात एक वेळ असा आला होता जेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली होती. वडिलांना मृतावस्थेत पाहून तिला मानसिक धक्का बसला होता. शाहरूखच्या वडिलांचे १९८१ साली कर्करोगाने निधन झाले होते. असे सांगितले जाते की त्याबद्दल शहनाज लालारूखला माहित नव्हते. त्यावेळी ती कुठेतरी बाहेर गेली होती. जेव्हा ती घरी परतली तेव्हा त्यांची डेड बॉडी पाहून बेशुद्ध झाली होती.या घटनेनंतर तिला खूप मानसिका धक्का बसला आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. त्यानंतर ती सातत्याने आजारी राहू लागली.
शहनाज लालारूख शाहरुख पेक्षा सहा वर्षे मोठी आहे आणि ती शाहरूखच्या कुटुंबासोबत मन्नतमध्ये राहते. शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी लालारूखची काळजी घेतात.
एका मुलाखतीत शाहरूखने सांगितले होते की, शहनाजला वडिलांच्या निधनाचा इतका मोठा धक्का बसला की ती तिचे मानसिक संतुलन बिघडून गेले. दोन वर्षे ती त्यातून बाहेर पडली नाही. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे शूटिंगदरम्यान तिची तब्येत बिघडली होती. त्यानंतर तिच्या उपचारासाठी स्वित्झर्लंडला गेले होते. उपचारानंतर तिची तब्येत आधीपेक्षा चांगली झाली पण ती पूर्णपणे बरी होऊ शकली नाही.