शाहिद कपूर व मीरा राजपूतच्या बाळासाठी चाहत्यांनी सुचवलीत भन्नाट नावे! वाचा, ट्विट!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 11:12 AM2018-09-06T11:12:49+5:302018-09-06T11:14:09+5:30
शाहिद व मीराच्या या दुस-या बाळाचे नाव काय असणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. होय, काल रात्रीपासूनचं सोशल मीडियावर शाहिद व मीराच्या नव्या बाळाचे नाव ट्रेंड करतेय.
काल ५ सप्टेंबरला शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी एका गोंडस बाळाचा जन्म झाला. मीराने मुलाला जन्म दिला. मीरा व शाहिद दुसऱ्यांदा आई-बाबा झालेत. साहजिकच कपूर आणि राजपूत कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडमधूनही शाहिद व मीरावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दुसरीकडे शाहिद व मीराच्या या दुस-या बाळाचे नाव काय असणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. होय, काल रात्रीपासूनचं सोशल मीडियावर शाहिद व मीराच्या नव्या बाळाचे नाव ट्रेंड करतेय. चाहत्यांनी दोघांना या नावाबद्दल अनेक सल्ले देणे सुरू केले आहे.
हे सल्ले चांगलेच मजेशीर आहेत. शाहिद व मीराने आपल्या पहिल्या मुलीचे नाव मीशा ठेवले. हे नाव शाहिद व मीरा या दोन नावांतील आद्याक्षरांवरून बनवण्यात आले होत़े. (मीराचा ‘मी’ आणि शाहिदचा ‘शा’) याच धर्तीवर चाहत्यांनी मीरा व शाहिदच्या दुस-या मुलासाठीही नाव सुचवले आहे.
Shahid & Mira , used first first 3 & 2 letters to name their daughter Misha . Now they can use last 3 & 2 letters to name the boy Rahid.
— vinay pratap (@vnaypratap) September 6, 2018
#MiraRajput
होय, मीराच्या नावातील शेवटचे अक्षर ‘रा’ आणि शाहिदच्या नावातील शेवटची दोन अक्षर ‘हिद’ असे मिळून राहिद हे नाव चाहत्यांनी सुचवले आहे.
@shahidkapoor
— KRK (@Krkofficial_) September 6, 2018
sir plz The Name Of Baby Boy Should Be Shami Kapoor, like Meesha Kapoor... It will b a great name sir..#MiraKapoor#MiraRajput#shahidkapoor#ThursdayMotivation
अन्य काही चाहत्यांनी मीरा व शाहिदच्या बाळासाठी ‘शामी’ (शाहिदमधील ‘शा’ आणि मीरामधील ‘मी’) हे नाव सुचवले आहे.
@shahidkapoor#MiraRajput first baby girl name is
— Sunil Mudgil (@iamsunilmudgil) September 6, 2018
Mi+Sha=Misha
Now baby boy name
Ra+Hid=Rahid😂😂
खरे तर हे सल्ले दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. पण शाहिद व मीरा चाहत्यांचे हे सल्ले खरचं मनावर घेतात की आपल्या मुलाचे यापेक्षा आणखी काही वेगळे नाव ठेवतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
दुस-या बाळाचे नाव काय ठेवणार, असा प्रश्न अलीकडे मीराला केला गेला होता.. या प्रश्नावर मीराने एक मजेशीर खुलासा केला होता. मीशाचे नाव शाहिदने ठेवले होते. तिचे नाव माझ्या आणि शाहिदच्या नावाचे कॉम्बिनेशन होते. पण दुस-या बाळाचे नाव, मग तो मुलगा होवो की मुलगी मी ठेवणार आहे. अर्थात अद्याप मी तरी कुठलेही नाव ठरवलेले नाही, असेही ती म्हणाली होती. २०१६ मध्ये शाहिद व मीराची पहिली मुलगी मीशा हिचा जन्म झाला होता.
नुकताच मीराने अॅक्टिंग डेब्यू केला. एका अॅण्टीएजिंग क्रिमची जाहिरात करताना ती दिसली. तिची ही जाहिरात बघून, तिच्या अॅक्टिंग टॅलेंटचे कौतुक केले तर काहींनी टीकाही केली. मात्र मला टीकेने काहीही फरक पडत नाही, असे मीराने स्पष्ट केले.