पाहा, शाहिद कपूर अन् मीरा राजपूतचा मुलगा झेनची पहिली झलक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 06:53 PM2018-09-07T18:53:08+5:302018-09-07T18:58:39+5:30
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या तान्हुला झेन रूग्णालयातून घरी आला. रूग्णालयातून घराकडे रवाना होत असताना झेनची पहिली झलक दिसली.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या तान्हुला झेन रूग्णालयातून घरी आला. रूग्णालयातून घराकडे रवाना होत असताना झेनची पहिली झलक दिसली. यावेळी पापा शाहिद कपूर आणि मोठी बहीण मीशा त्याच्यासोबत होते.
झेनच्या जन्माचा आनंद मीरा आणि शाहिद या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. ऐरवी मीडियाला पाहून काहीशी रागात येणारी मीरा झेनला कुशीत घेऊन अगदी आरामात मीडियाला पोज देताना दिसली.
गत ५ सप्टेंबरला मीराने मुलाला जन्म दिला़ मीरा व शाहिदचे हे दुसरे अपत्य आहे. या बाळाचे झेन असे नामकरण करण्यात आले आहे. आजच शाहिदने सोशल मीडियावरून याची घोषणा केली. आता आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे. मुलाचे नाव झेन ठेवण्यात आले आहे,असे त्याने सांगितले.
शाहिद-मीराच्या मुलाच्या नावासाठी सोशल मीडियावर चाहत्यांनी या कपलला मजेशीर सल्ले दिले होते. यामध्ये राहिद कपूर आणि शमी कपूर हे दोन पर्याय चाहत्यांनी सुचवले होते. शाहिद व मीरा यांना आधीच मीशा नावाची दोन वर्षांची मुलगी आहे. शाहिद-मीराच्या लग्नाच्या एक वषार्नंतरच मुलगी मीशा (26 आॅगस्ट 2016)चा जन्म झाला. ती गत 26 आॅगस्टला 2 वर्षांची झाली.
तूर्तास झेनच्या जन्मानंतर शाहिद आणि मीरावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आलिया भट्ट, प्रिती झिंटा, करणवीर बोहरासोबतच अनेक स्टार्सने शाहिद-मीराला शुभेच्छा दिल्या आहेत.