'कबीर सिंह'चा पारा चढला, मुलांचे फोटो घेणाऱ्या पापाराझींना शाहीद कपूरने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:11 PM2023-12-18T16:11:40+5:302023-12-18T16:12:16+5:30

एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता शाहीद कपूर आता अँग्री यंग मॅनच्या लूकमध्येच जास्त बघायला मिळतो.

Shahid Kapoor angry at paparazi who were clicking photos of his children outside annual function of school | 'कबीर सिंह'चा पारा चढला, मुलांचे फोटो घेणाऱ्या पापाराझींना शाहीद कपूरने सुनावलं

'कबीर सिंह'चा पारा चढला, मुलांचे फोटो घेणाऱ्या पापाराझींना शाहीद कपूरने सुनावलं

अनेक बॉलिवूड कलाकारांची मुलं मुंबईतल्या प्रसिद्ध धीरुभाई अंबानी शाळेत शिकतात. नुकतंच शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं. यासाठी बॉलिवूड स्टार्स आपल्या मुलांना चिअर करण्यासाठी पोहोचले. मुंबईतील बीकेसी परिसरात हे फंक्शन आयोजित करण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या आराध्याचा परफॉर्मन्स बघण्यासाठी आले. तर शाहरुखही अबरामचा परफॉर्मन्स बघण्यासाठी सहकुटुंब आला. शाहीद कपूरची (Shahid Kapoor) लेक मिशा देखील यात सहभाग घेतला होता. यावेळी स्टार्सचे फोटो घेणाऱ्या पापाराझींवर शाहीद कपूर चांगलाच भडकताना दिसला. 

एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता शाहीद कपूर आता अँग्री यंग मॅनच्या लूकमध्येच जास्त बघायला मिळतो. नुकतंच शाहीदने पापाराझींना चांगलंच सुनावलं आहे.  धीरुभाई अंबानी शाळेतील मुलांचा वार्षिक सोहळा पार पडल्यानंतर शाहीद कपूर पत्नी मीरा, मिशा आणि झैन मुलांना घेऊन बाहेर आला. तेव्हा पापाराझींनी फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. मुलांचे फोटो घेत आहेत हे बघून शाहीद भडकला. रागातच तो पापाराझींना म्हणाला,'मुलांसोबत नका करत जाऊ. दीडशे फोटो तर घेतलेत तुम्ही आतापर्यंत.'

शाहीद भडकलेला असताना मागे उभ्या असलेल्या मीराचाही चेहरा पडला. पापाराझींनी शाहीदची माफी मागितली मात्र तरी त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. शाहीदने फोटोग्राफर्सवर भडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने पापाराझींवर राग व्यक्त केला आहे. सध्या शाहीदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Web Title: Shahid Kapoor angry at paparazi who were clicking photos of his children outside annual function of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.