शाहिद कपूरने खरेदी केले मुंबईत नवे घर, किंमत ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 12:17 PM2018-07-23T12:17:06+5:302018-07-23T12:24:00+5:30

शाहीद दुसऱ्यांदा वडील बनणार असून बाळाच्या जन्मापूर्वीच त्याने पत्नी मीराला एक आलिशान घर भेट म्हणून दिले आहे.

Shahid Kapoor bought a new home in Mumbai | शाहिद कपूरने खरेदी केले मुंबईत नवे घर, किंमत ऐकून बसेल धक्का

शाहिद कपूरने खरेदी केले मुंबईत नवे घर, किंमत ऐकून बसेल धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देशाहिदच्या नव्या घराची किंमत आहे 55 कोटी 60 लाखशाहिद होणार दुसऱ्यांदा वडील शाहिद दिसणार 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमात

बॉलिवूडमधील सेलिब्रेटी सध्या नवीन घर खरेदी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांनी मुंबईमध्ये एक नवीन घर खरेदी केले होते. यानंतर आता अभिनेता शाहिद कपूरने देखील मुंबईत एक नवे घर खरेदी केले आहे. शाहिद दुसऱ्यांदा वडील बनणार असून बाळाच्या जन्मापूर्वीच त्याने पत्नी मीराला एक आलिशान घर भेट म्हणून दिले आहे. त्याने वरळीमध्ये डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. घराची किंमत ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. कारण या घराची किंमत 56 कोटी आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहिदच्या नव्या घराची किंमत 55 कोटी 60 लाख आहे. त्याचे हे घर 42 आणि 43 व्या माळ्यावर आहे. शाहिदने या घरासाठी 2 कोटी 91 लाखांची स्टँप ड्यूटी दिली आहे. शाहीदचे हे घर खूपच अलिशान असल्याची चर्चा आहे. तो लवकरच या घरामध्ये शिफ्ट होणार आहे. 
शाहिदला हे वर्ष खूप लकी ठरल्याचे बोलले जात आहे. जानेवारी महिन्यात त्याचा बहुचर्चित चित्रपट 'पद्मावत' प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटात त्याने महाराजा रतन सिंगची भूमिका केली होती आणि या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले होते. आता लवकरच तो 'बत्ती गुल मीटर चालू' सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायऱ्या झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा यात दाखवणार असल्याचे कळते. शाहिदची पत्नी मीरा कपूर हिला या सिनेमाची कथा भलतीच आवडली होती आणि तिनेच या सिनेमासाठी शाहिदला तयार केल्याचे मानले जाते. 21 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: Shahid Kapoor bought a new home in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.