शाहिद कपूरच्या ओठांना पडले 25 टाके, हा व्हिडीओ पाहताना क्षणभर तुम्हालाही येईल टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 10:16 AM2021-12-19T10:16:03+5:302021-12-19T10:17:27+5:30

Jersey, Shahid Kapoor : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर सध्या चर्चेत आहे तो त्याच्या ‘जर्सी’ या चित्रपटामुळे. या चित्रपटासाठी शाहिदने बराच घाम गाळला. अगदी रक्तही सांडवलं.

Shahid Kapoor Gives Jersey His Sweat And Blood Has Bad Injury That Needs 25 Stitches Watch | शाहिद कपूरच्या ओठांना पडले 25 टाके, हा व्हिडीओ पाहताना क्षणभर तुम्हालाही येईल टेन्शन!

शाहिद कपूरच्या ओठांना पडले 25 टाके, हा व्हिडीओ पाहताना क्षणभर तुम्हालाही येईल टेन्शन!

googlenewsNext

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या चर्चेत आहे तो त्याच्या ‘जर्सी’ (Jersey) या चित्रपटामुळे. होय, येत्या 31 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाशी संबंधित अनेक व्हिडीओ व फोटो शाहिदने शेअर केले आहेत. पण ताजा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या चित्रपटासाठी शाहिदने किती प्रचंड मेहनत घेतली, याचीही कल्पना तुम्हाला येईल.

या सिनेमात शाहिद आपल्याला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हीच भूमिका साकारताना शाहिदच्या बॉलचा असा काही दणका शाहिदच्या ओठांवर लागला की, तो जागीच कोसळला.

व्हिडीओत, सर्वप्रथम  शाहिद  हातात बॅट घेऊन स्टेडियममध्ये एन्ट्री घेताना दिसतो. हा शॉट कदाचित चित्रपटातील आहे. पण यानंतरचं सगळं रिअल आहे. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटासाठी सराव करतानाच हा व्हिडीओ. या सरावादरम्यान शाहिदने बराच घाम गाळला. अगदी रक्तही सांडवलं. होय, सरावादरम्यान एक बॉल शाहिदच्या ओठांवर आदळतो आणि रक्त बाहेर येतं. आधी किरकोळ जखम आहे म्हणून शाहिद रूमालाने रक्त पुसतो पण नंतर अगदी ओठांतून रक्ताची धार यायला लागते. टी-शर्ट रक्तानं लाल होते. मग काय, सगळ्यांच्या काळजात धस्स होतं आणि शाहिदला डॉक्टरकडे नेण्यात येतं. शाहिदच्या ओठांना 25 टाके पडतात. व्हिडीओमध्ये शाहिदची हा सर्व प्रवास दाखवण्यात आला आहे.

या घटनेनंतर जवळ-जवळ महिनाभर ‘जर्सी’चं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. शिवाय  25 टाके पडल्यानंतर शाहिदचे ओठ कसे दिसतील या टेन्शनमध्ये सगळे होते. पण शाहिद मुळातच फाईटर. तो  बरा परतला आणि सर्वांना हायसं वाटलं. हा BTS व्हिडीओ शेअर करताना, ‘यासाठी मी रक्त सांडवलंय,’असं कॅप्शन शाहिदने दिलं आहे.

या सिनेमात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर लीड रोलमध्ये आहे. हा सिनेमा ‘जर्सी’ याच नावाच्या साऊथ सिनेमाचा रिमेक आहे.

Web Title: Shahid Kapoor Gives Jersey His Sweat And Blood Has Bad Injury That Needs 25 Stitches Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.