OMG! शाहिद कपूरने मेकर्सचा अडचण लक्षात घेत, 'जर्सी' सिनेमासाठी केले मानधनातून 8 कोटी कमी
By गीतांजली | Published: October 5, 2020 10:40 AM2020-10-05T10:40:32+5:302020-10-05T10:47:35+5:30
कोरोना काळात फिल्ममेकर्सचे शूटिंग बंद पडल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
कोरोना व्हायरसचा आर्थिक फटका सगळ्या इंडस्ट्रीला बसला बिघडली आहे. फिल्म इंडस्ट्रीचे देखील यात नुकसान झाले आहे. शाहिद कपूरने आगामी सिनेमा 'जर्सी'ची फीस कमी केली आहे.
शाहिदने 2 अटींवर साईन केला होता जर्सी
कोरोना काळात फिल्ममेकर्सचे शूटिंग बंद पडल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनलॉकच्या प्रकियेनुसार कोविडमुळे सुरक्षिततेचे नियम पाळण्यासाठी आणि सेटवर त्यासंबंधित इतर गोष्टींची काळजी घेण्यासाठी खर्च वाढला आहे. त्यामुळे शाहिद कपूरने आपल्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहिदने दोन अटींवर जर्सी सिनेमा साईन केला होता. ज्यातील पहिला अट होती शाहिदने यासिनेमासाठी 33 कोटींचे मानधन घेतले आणि दुसरी सिनेमाचे प्रॉफिट शेअर मागितले होते. शाहिदच्या या दोनही मागण्या मान्य करुन मेकर्सनी सिनेमाचे शूटिंग देखील सुरु केले होते. त्यानंतर कोरोनामुळे सगळी परिस्थिती बदलली आणि मेकर्सना कलाकारांनी आपल्या मानधनात कपात करण्यास सांगावे लागले.
शाहिदने मानधनात केली कपात
मिळालेल्या माहितीनुसार शाहिद कपूरने मेकर्सची झालेली आर्थिक अडचण लक्षात घेत आपल्या मानधनातून 8 कोटी कमी केले आहेत. शाहिद आता जर्सीसाठी 25 कोटींचे मानधन घेणार आहे. प्रॉफीट शेअरची अट अजूनही कायम आहे. गौतम तिन्ननुरी यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव अर्जुन होते. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने केली होती. भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला होता. आता हिंदीत हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
शाहिद कपूरने नेटफ्लिक्ससोबत साइन केली १०० कोटी रूपयांची डील, या प्रोजेक्ट्सवर करेल काम