हरणाचा फोटो शेअर केल्याने उघड झाले शाहिद कपूरचे अज्ञान; वाचा फोटोमागील सत्यकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 03:44 PM2017-02-15T15:44:04+5:302017-02-15T21:18:53+5:30

हल्ली सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट शेअर केली की त्याची शहानिशा न करताच हौशी मंडळी त्यावर लाईक्स आणि कमेण्ट्सचा पाऊस ...

Shahid Kapoor ignored by sharing photos of Hare; Read the photo truth story | हरणाचा फोटो शेअर केल्याने उघड झाले शाहिद कपूरचे अज्ञान; वाचा फोटोमागील सत्यकथा

हरणाचा फोटो शेअर केल्याने उघड झाले शाहिद कपूरचे अज्ञान; वाचा फोटोमागील सत्यकथा

googlenewsNext
्ली सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट शेअर केली की त्याची शहानिशा न करताच हौशी मंडळी त्यावर लाईक्स आणि कमेण्ट्सचा पाऊस पाडतात. आता या हौशी मंडळीत अभिनेता शाहिद कपूर याचाही समावेश झाला आहे. त्याचे झाले असे की, शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका हरणाचा फोटो शेअर करीत महिलांचा प्रत्येकाने सन्मान करावा, असा संदेश दिला. अर्थात त्याचा हा संदेश योग्य असला तरी, फोटोमागील कथा काही औरच असल्याने त्याचे अज्ञान उघड करणारा ठरला आहे. नेमकी हीच कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 



शाहिद कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हाच तो फोटो
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चित्त्यांच्या गराड्यात असलेला एक हरणाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी या हरिणीने स्वत:ला चित्त्याच्या स्वाधीन केले आहे. विशेष म्हणजे ज्या तरुणीने हा फोटो शेअर केला आहे तीही डिप्रेशनमध्ये गेली आहे.’ मग काय हा फोटो असा काही नेटिझन्सनी शेअर केला की, सगळीकडेच त्याला वेगवेगळ्या अर्थाचे कॅप्शन देऊन शेअर केले गेले.

एका मुलीचा बाप असलेल्या अभिनेता शाहिद कपूरनेही नवशा नेटिझन्सप्रमाणे त्याच्या आॅफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करून ‘महिलांचा सन्मान राखा’ असा संदेश देत हरिणाची चुकीची कथा शेअर केली. त्याने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कुठलाच पुरुष ते करू शकत नाही, जे एक आई करू शकते. पुरुषांच्या तुलनेत महिला अनेक पटीने पुढे आहेत. त्यांचा सन्मान करा, आदर करा,’ शाहिदच्या या फोटोला काही तासांतच हजारो लाइक्स मिळाल्या. त्याचबरोबर शाहिदने शेअर केलेल्या या फोटोमध्ये असलेली कथा वाचून अनेक नेटिझन्स भावुकही झाले. मात्र या फोटोमागील खरी कथा वेगळीच असल्याने शाहिदचे अज्ञानही त्यानिमित्त उघड झाले. 

कारण या फोटोमागील सत्यकथा जाणून घेण्यासाठी जेव्हा एका इंग्रजी दैनिकाने संबंधित फोटोग्राफरशी संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितलेले वास्तव अगदीच विपरीत होते. फिनलँड इथल्या एलिसन बुटिगेग या फोटोग्राफर तरु णीने हा फोटो काढला असून, तिने याविषयीचा खुलासा केला. त्याचबरोबर एलिससने आपल्या फेसबुक पेजवरूनही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

">


एलिसन बुटिगेग ही वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आहे. ‘चित्ता’ हा तिच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. त्याचे फोटो काढण्यासाठी ती अनेक जंगलांमध्ये फिरली आहे. या भटकंतीदरम्यानच तिने हा हरिण-चित्त्याच्या शिकारीचा फोटो काढला. मात्र यामुळे ती अजिबात डिप्रेशनमध्ये गेली नाही. 

याविषयी एलिसन सांगतेय की, आपल्या बछड्यांना शिकार शिकवण्यासाठी चित्त्याने हे हरिण पकडले होते. त्यांचे हे शिकारीचे प्रशिक्षण मी कॅमेºयात टिपले. त्यामुळे माझ्या मानसिक स्थितीवर कुठलाही विपरीत परिणाम झालेला नाही. चित्ता शिकार शिकवत असताना हरिणाशी खेळत होते. चित्त्यांचा ग्रुपच असल्याने हरिण त्यांच्यासमोर हतबल म्हणून उभे होते. अन् थोड्या वेळात जे घडायचे तेच झाले. चित्त्याच्या बछड्यांनी या हरिणाची शिकार केली. आईच्या मार्गदर्शनाखाली बछड्यांनी हरिणाची शिकार केली अन् अन्न ही मूलभूत गरज भागविण्यासाठी काय करायचं हा पहिला धडा शिकला. खरं तर ही सर्व कथा हृदयद्रावक आहे. परंतु हा अन्नसाखळीचा एक भाग असल्याचेही एलिसनने सांगितले. 

आता ही खरी कथा जेव्हा शाहिदला समजेल तेव्हा आपण हौशा-नवशासारखी तर पोस्ट शेअर केली नाही ना असा प्रश्न त्याला पडल्याशिवाय राहणार नाही. सध्या तो त्याच्या आगामी ‘रंगून’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्याने केलेल्या या उताविळपणाविषयी जर कोणी त्याला प्रश्न विचारला तर त्याची पंचाईत झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की!

एलिसनने काढलेले या शिकारीचे काही फोटोः 
(सौजन्यः http://www.alisonbuttigieg.com)








 

Web Title: Shahid Kapoor ignored by sharing photos of Hare; Read the photo truth story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.