OMG!! शाहिद कपूरने शेअर केला बेडरूम व्हिडीओ, मीरा झाली नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 10:48 AM2020-04-19T10:48:47+5:302020-04-19T10:49:59+5:30
पाहा व्हिडीओ...
कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूडकरही आपआपल्या घरात बंद आहेत. पण सोशल मीडियावर मात्र बॉलिवूडकर नको इतके अॅक्टिव्ह आहेत. आता हेच बघा ना शाहिद कपूरने चक्क बेडरूममधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. शाहिदने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आणि शेअर करताच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडीओत शाहिद त्याच्या बेडरूममध्ये आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी मीरा राजपूतही दिसतेय. एकीकडे मीरा आपल्या फोनवर बिझी आहे आणि दुसरीकडे शाहिद मस्तीत व्हिडीओ शूट करतोय. व्हिडीओत पत्नीला दाखवत तो वारंवार वी बोथ आर सेक्सी...सेक्सी... असा शब्द रिपीट करताना दिसतोय. मीराचा चेहरा बघता, शाहिदच्या या मस्तीमुळे ती चांगलीच वैतागलेली दिसतेय. 6 एप्रिलला रात्री 10.50 वाजता हा व्हिडीओ शूट केला गेला आहे.
म्हणायला हा व्हिडीओ चांगलाच फनी आहे. पण तो शेअर करताना शाहिदने मात्र एकदम उलट कॅप्शनदिले आहे. ‘काळासोबत आम्ही अधिक बुद्धिमान व समजदार होऊ लागलो आहोत,’ असे त्याने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
शाहिद व मीरा बॉलिवूडच्या लोकप्रिय कपलपैकी एक आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. मीराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. मध्यंतरी मीरा आणि शाहिद कपूर ‘नच बलिये’ शोला जज करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र काही कारणामुळे मीराचे आॅनस्क्रीन झळकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. हातात कोणत्याही प्रकारचे काम नसतातना मीरा शाहिदपेक्षा जास्त चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते.
2015 मध्ये मीरा व शाहिदचे लग्न झाले होते. दोघांनाही दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मीरा बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे.