शाहिद कपूरने अक्षय कुमारची उडवली खिल्ली?, म्हणाला - "मी मिशा लावून अभिनय करत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:40 AM2023-10-31T10:40:53+5:302023-10-31T10:41:17+5:30
Shahid Kapoor : कलाविश्वात कलाकार अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. यावेळी बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. खरंतर त्याने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.
कलाविश्वात कलाकार अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. यावेळी बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर (Shahid Kapoor) त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. खरंतर त्याने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar)वर निशाणा साधला आहे. वर्षातून एक-दोनच चित्रपट किंवा मालिका करायला आवडत असल्याचं तो सांगतो. शाहिद कपूरची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. करिअरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत त्याने असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. २००७ मध्ये रिलीज झालेल्या ऑल-टाइम ब्लॉकबस्टर जब वी मेटमधून त्याने आपले गमावलेले स्टारडम परत मिळवले. यानंतर २०१९ मध्ये या अभिनेत्याने ब्लॉकबस्टर चित्रपट कबीर सिंगद्वारे बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवून दिली. या चित्रपटानंतर अभिनेत्याने आपली फीही वाढवली. तो म्हणतो की, त्याला बॅक टू बॅक चित्रपट करायला आवडत नाही. इतकेच नाही तर शाहिदने अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.
शाहिद कपूरने अलीकडेच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारवर ताशेरे ओढले. त्याला विचारण्यात आले की तो इतके कमी चित्रपट का करतो. तो इतका निवडक का आहे? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणाला, 'तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. हा प्रश्न मी स्वतःलाही अनेकदा विचारतो. पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. आता जास्तीत जास्त चित्रपट करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण मी मिशा लावून अभिनय करत नाही.
२००७ मध्ये परत मिळाले स्टारडम
शाहिद कपूर हा अष्टपैलू अभिनेता आहे. त्याची फॅन फॉलोइंगही चांगली आहे. बॅकग्राउंड डान्सर म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली. जरी त्याची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. २००७ मध्ये 'जब वी मेट' सारखा ब्लॉकबस्टर देऊनही त्याला बरीच वर्षे काम मिळाले नाही. यानंतर २०१९ मध्ये त्याने कबीर सिंग सारख्या चित्रपटातही काम केले. ज्यांच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत चांगले-वाईट असे सर्व प्रकार पाहिले आहेत.
शाहीदच्या या विधानाला लोक अक्षय कुमारशी जोडत आहेत आणि त्याने खिलाडी कुमारची खिल्ली उडवली आहे. कारण तो एका वर्षात अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. अक्षयच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राणीगंजमध्येही तो मिशी लावून पंजाबी भूमिका करताना दिसला होता.