'कामासाठी भीक मागावी लागली'; 'कबीर सिंह'नंतर शाहिदची झाली होती बिकट परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:36 PM2021-11-24T12:36:27+5:302021-11-24T12:38:52+5:30

shahid kapoor: शाहिदचा आगामी 'जर्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिदने एक मोठा खुलासा केला आहे.

shahid kapoor opens about kabir singh success he asking for work like a beggar | 'कामासाठी भीक मागावी लागली'; 'कबीर सिंह'नंतर शाहिदची झाली होती बिकट परिस्थिती

'कामासाठी भीक मागावी लागली'; 'कबीर सिंह'नंतर शाहिदची झाली होती बिकट परिस्थिती

googlenewsNext

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय असं बिरूद मिरवणारा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर (shahid kapoor). बॉलिवूडमध्ये असंख्य चित्रपट करणाऱ्या शाहिदला खरी ओळख 'कबीर सिंह' (kabir singh) या चित्रपटामुळे मिळाली. त्यातच त्याचा आगामी 'जर्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून शाहिद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिदने एक मोठा खुलासा केला आहे. 'कबीर सिंह' यशस्वी झाल्यानंतरही शाहिदला कामासाठी अनेक दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवावे लागल्याचं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला 'कबीर सिंह' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. मात्र, हा चित्रपट यशस्वी ठरुनही शाहिदला त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्याला काम मिळवण्यासाठी अनेकांकडे कामासाठी हात पसरावे लागले.

"कबीर सिंह प्रदर्शित झाल्यानंतर मला अनेकांकडे कामाची भीक मागावी लागली.  मी त्या सगळ्यांकडे गेलो जे २००-२५० कोटी रुपये बजेट असलेले चित्रपट तयार करत होते. मी कधीच इतक्या मोठ्या क्लबचा भाग नव्हतो. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं", असं शाहिद म्हणाला.

दरम्यान, शाहिदचा 'जर्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका तेलुगू चित्रपटाचा रिमेक असून यातून एका क्रिकेटरचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. 

Web Title: shahid kapoor opens about kabir singh success he asking for work like a beggar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.