‘हे’ तीन सिनेमे साईन करायला नको होते; शाहिद कपूरला आजही होतो पश्चाताप!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 10:13 AM2019-01-22T10:13:28+5:302019-01-22T10:14:02+5:30
शाहिदचे काही चित्रपट हिट ठरलेत तर काही फ्लॉप. पण कदाचित या फ्लॉप सिनेमानंतरचे दु:ख शाहिद अद्यापही विसरू शकलेला नाही.
ठळक मुद्देतूर्तास शाहिद ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’मध्ये बिझी आहे. यात शाहिदचा अॅक्शन अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
अभिनेता शाहिद कपूरचे टॅलेंट कुणापासूनही लपलेले नाही. विवाह, कमीने, पद्मावत, हैदर, उडता पंजाब अशा अनेक चित्रपटातून त्याने आपली छाप सोडली. ‘पद्मावत’ तर शाहिदचा आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा हिट चित्रपट होता. यात शाहिदने राजा रतन सिंह राजपूतची व्यक्तिरेखा साकारली होती. शाहिदचे असेच काही चित्रपट हिट ठरलेत तर काही फ्लॉप. पण कदाचित या फ्लॉप सिनेमानंतरचे दु:ख शाहिद अद्यापही विसरू शकलेला नाही. म्हणूनच हे सिनेमे केलाचा पश्चाताप त्याला आजही होता.
होय, अलीकडे एका ताज्या मुलाखतीत शाहिदने हा पश्चाताप बोलून दाखवला. फिल्मी करिअरमध्ये तीन चित्रपट केल्याचा मला आजही पश्चाताप होतो, असे तो म्हणाला. यातील पहिला चित्रपट आहे, ‘शानदार’. या चित्रपटात शाहिद आलिया भट्टसोबत दिसला होता. हा चित्रपट दणकून आपटला होता. दुसरा आणखी एक चित्रपट केल्याचा पश्चाताप शाहिदला होतो, तो म्हणजे, ‘चुप चुप के’. २००६ मध्ये आलेल्या प्रियदर्शन दिग्दर्शित या सिनेमात शाहिदच्या अपोझिट करिना कपूर झळकली होती. तिसरा चित्रपट आहे, ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’.
‘वाह! लाईफ हो तो ऐसी’ हा चित्रपट करताना हा इंटरनॅशनल चित्रपट असेल, असेच आम्हाला वाटले होते. पण आमच्याकडे त्या दर्जाचे कंप्युटर ग्राफिक्स नव्हते. हे तिन्ही चित्रपट मी का साईन केलेत, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. या तिन्ही चित्रपटांबद्दल मला पश्चाताप होतो, असे शाहिदने सांगितले.
गतवर्षी शाहिदचा ‘बत्ती गुल मीटर चालू’ रिलीज झाला होता. यात तो श्रद्धा कपूरसोबत दिसला होता. या चित्रपटानेही चाहत्यांची निराशा केली होती. तूर्तास शाहिद ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’मध्ये बिझी आहे. यात शाहिदचा अॅक्शन अवतार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.