शाहिद कपूरने फुकटात केलं 'हैदर' चित्रपटासाठी काम, म्हणाला, 'जर मी फिस घेतली असती तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 01:56 PM2023-09-24T13:56:29+5:302023-09-24T13:57:24+5:30

शाहिदने हैदर हा चित्रपट फुकटात केला होता. त्यानं या चित्रपटासाठी एकही पैसा घेतलेला नाही.

Shahid Kapoor Reveals He Did Haider For FREE | शाहिद कपूरने फुकटात केलं 'हैदर' चित्रपटासाठी काम, म्हणाला, 'जर मी फिस घेतली असती तर...'

Shahid Kapoor

googlenewsNext

अभिनेता शाहीद कपूरने अनेक हीट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. यातीलच एक चित्रपट म्हणजे हैदर. 2014 हैदर हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील शाहिद कपूरच्या भूमिकेचं विशेष काैतुक देखील करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाविषयी शाहिद कपूरने मोठा खुलासा केलाय. शाहिदने हैदर हा चित्रपट फुकटात केला होता. त्यानं या चित्रपटासाठी एकही पैसा घेतलेला नाही.

शाहिद कपूरने नुकतीच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये शाहिद कपूर म्हणाला की, "मी हैदर या चित्रपटासाठी काहीच फिस घेतली नाही. कारण, चित्रपटासाठीचं फार काही बजेट नव्हतं. जर मी फिस घेतली असती तर चित्रपट तयारच होऊ शकला नसता".

‘हैदर’ हा शाहिदच्या कारकीर्दीतील आव्हानात्मक चित्रपट होता. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’वर आधारित विशाल भारद्वाजच्या या चित्रपटात शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. तर इरफान खान, तब्बू आणि के के मेनन यांच्याही चित्रपटात भूमिका होत्या. या चित्रपटाने शाहिदच्या करिअरची गाडी रुळावर आणली होती.

‘हैदर’चे चित्रीकरण काश्मिरमध्ये करण्यात आलं होतं. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला चित्रीकरणावेळी वारंवार स्थानिक नागरिकांच्या निषेधाला सामोरे जावे लागलं होतं.

शाहीदच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवटचा ब्लडी डॅडी चित्रपटात दिसला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट चाहत्याच्या पंसतीस पडला. याशिवाय शाहिद लवकरच क्रिती सेननसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: Shahid Kapoor Reveals He Did Haider For FREE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.