​शाहिद कपूर म्हणतो, स्टार नाही, सुपरस्टार म्हणा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2017 08:11 AM2017-04-16T08:11:54+5:302017-04-16T13:41:54+5:30

बॉलिवूडमध्ये खरे तर टॅलेंटची कमतरता नाहीच. एकापेक्षा एक दिग्गज, हरहुन्नरी लोक या इंडस्ट्रीमध्ये आहेत. स्टार आणि सुपरस्टारबद्दल बोलायचे झाल्यास, ...

Shahid Kapoor says no star, say superstar !! | ​शाहिद कपूर म्हणतो, स्टार नाही, सुपरस्टार म्हणा!!

​शाहिद कपूर म्हणतो, स्टार नाही, सुपरस्टार म्हणा!!

googlenewsNext
लिवूडमध्ये खरे तर टॅलेंटची कमतरता नाहीच. एकापेक्षा एक दिग्गज, हरहुन्नरी लोक या इंडस्ट्रीमध्ये आहेत. स्टार आणि सुपरस्टारबद्दल बोलायचे झाल्यास, बॉलिूवडमध्ये असे अनेक सुपरस्टार्स आहेत, ज्यांना आपल्या यशाचा कवडीचाही अभिमान नाही. पण असेही काही  लोक आहेत, ज्यांना सुपरस्टार म्हणून मिरवण्याची हौस आहे. लोकांनी आपल्याला स्टार नाही तर सुपरस्टार म्हणून बोलवावे, असा त्यांचा हेका आहे. होय, आम्ही बोलतोय, ते बॉलिवूड स्टार शाहिद कपूर याच्याबद्दल. स्वत:च्या नावापुढे ‘सुपरस्टार’ हा शब्द लावण्याची शाहिदला भारी हौस. अलीकडे शाहिदने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या मॅगझिनचा अंक छपाईसाठी जाण्यापूर्वी त्याची एक कॉपी शाहिदला पाठवली गेली. मग काय, शाहिदने ही कॉपी पाहिली अन् तो जाम भडकला. माझ्या नावापुढे ‘स्टार’ का, ‘सुपरस्टार’ का नाही?असा सवाल त्याने केला. शिवाय माझ्या नावासमोरचे ‘स्टार’ काढून ‘सुपरस्टार’ लावा, असेही बजावले. यानंतर संबंधित मॅगझिनने लगेच बदल केलेत आणि शाहिदच्या नावापुढे ‘सुपरस्टार’ लावले गेले.  मग काय, नावापुढचा  ‘सुपरस्टार’ शब्द वाचून शाहिद सुखावला नसेल तर नवल.
सध्या शाहिद ‘पद्मावती’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाकडून शाहिदला बºयाच अपेक्षा आहेत. यापूर्वी आलेला शाहिदचा ‘रंगून’ हा सिनेमा बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. त्यामुळेच आता या सुपरस्टारला एका हिटची प्रतीक्षा आहे. सुपरस्टार म्हणून मिरवणं आणि हे स्टारडम टिकवण, शेवटी हे टिकवायचे म्हटल्यास एवढा आटापिटात तर करावाच लागेल ना? असो तूर्तास   शाहिद कपूरला आपण शुभेच्छा देऊ यात... सॉरी...सॉरी  ‘सुपरस्टार’ शाहिद कपूरला शुभेच्छा देऊ यात!!

Web Title: Shahid Kapoor says no star, say superstar !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.