शाहिद कपूरने हे ठेवले मुलाचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 03:19 PM2018-09-07T15:19:04+5:302018-09-07T15:20:58+5:30
शाहिदच्या मुलाचे नाव त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. त्याच्या मुलाचे नाव त्याच्या चाहत्यांना खूप आवडले असल्याचे त्या त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
शाहिद कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच त्याच्या मुलाचे नाव सगळ्यांना सांगितले आहे. त्याने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच एक ट्वीट केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, झेन आमच्या आयुष्यात आल्याने आमचे कुटुंब आता पूर्ण झालेले आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. असेच प्रेम आमच्यावर करत राहा... लव्ह यू ऑल.
शाहिदच्या मुलाचे नाव त्याने झेन ठेवले असून त्याच्या मोठ्या मुलीचे नाव मीशा आहे. शाहिदच्या पत्नीचे नाव मीरा असून त्या दोघांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. झेन हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. मीराची आई बेला, शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर, भाऊ ईशान खट्टर झेनच्या जन्माच्या वेळी रुग्णालयात होते. शाहिद कपूर सध्या पालकत्वाच्या सुट्टीवर असून जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवत आहे. या सुट्टीमुळेच शाहिद कपूरने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे.
शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे अरेंज मॅरेज झाले आहे. शाहिद आणि मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते.
शाहिद आणि मीराच्या या दुसऱ्या बाळाचे नाव काय असणार, याबद्दलची उत्सुकता त्याच्या फॅन्समध्ये चांगलीच वाढली होती. त्याच्या बाळाच्या जन्मापासूनच सोशल मीडियावर शाहिद आणि मीराच्या नव्या बाळाचे नाव ट्रेंड होतेय. चाहत्यांनी दोघांना या नावाबद्दल अनेक सल्ले देणे सुरू केले होते. हे सल्ले चांगलेच मजेशीर होते. शाहिद आणि मीराने आपल्या पहिल्या मुलीचे नाव मीशा ठेवले. हे नाव शाहिद आणि मीरा या दोन नावांतील आद्याक्षरांवरून बनवण्यात आले होत़े. याच धर्तीवर चाहत्यांनी मीरा आणि शाहिदच्या दुसऱ्या मुलासाठीही नाव सुचवले होते.
Zain Kapoor is here and we feel complete. Thank you for all the wishes and blessings. We are overjoyed and so grateful. Love to all. ❤️🙏
— Shahid Kapoor (@shahidkapoor) September 7, 2018