एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरला भेटल्यावर शाहिदची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- "आम्ही दोघं.."
By देवेंद्र जाधव | Updated: March 9, 2025 14:26 IST2025-03-09T14:26:12+5:302025-03-09T14:26:46+5:30
इतक्या वर्षांनी जाहीर कार्यक्रमात करीना कपूरशी भेटून गप्पा मारल्यावर शाहिदने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली (shahid kapoor, kareena kapoor)

एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरला भेटल्यावर शाहिदची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- "आम्ही दोघं.."
"दो दिल मिल रहे है.." अशी भावना काल सर्वांची होती. कारण आयफा पुरस्कार (iifa awards) सोहळ्याआधीची पत्रकार परिषद काल मुंबईत पार पडली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये गेले काही वर्ष जाहीर इव्हेंटमध्ये एकमेकांसोबत बोलणं टाळत असणारे शाहिद कपूर-करीना कपूर (kareena kapoor) एकमेकांसमोर आले. हे दोघे केवळ एकमेकांसमोर आले नाही तर त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि एकमेकांशी गप्पाही मारल्या. या भेटीनंतर शाहिदने (shahid kapoor) दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
करीनाला भेटल्यावर शाहिदला कसं वाटलं?
आयफाच्या प्रेस कॉन्फरन्सवेळी शाहिदला जेव्हा करीनाच्या भेटीवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने दिलेलं मोजकंच उत्तर चर्चेत आहे. शाहिद म्हणाला की, "हे खूप नॉर्मल आहे. आमच्यासाठी ही खूप साधारण गोष्ट आहे. हे काही नवीन नाही. आज आम्ही स्टेजवर भेटलो पण एरवी आम्ही बाहेर इथे-तिथे भेटतच असतो." अशा शब्दांमध्ये शाहिदने करीनाच्या भेटीवर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सरतेशेवटी इतकंच सांंगायचं तर, शाहिद आणि करीना दोघांचंही खऱ्या आयुष्यात आता वेगवेगळ्या पार्टनरसोबत लग्न झालं असून त्यांना मुलंही आहेत. दोघं एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते हे आपल्या सर्वांना माहितच आहे. परंतु होऊन गेलेल्या नात्याचा त्यांच्या मनात आदर आहे. त्यामुळे तो आदर तसाच ठेऊन शाहिद-करीना खऱ्या अर्थाने आयुष्यात 'मूव्ह ऑन' झाले आहेत. त्यामुळे शाहिदने करीनाच्या भेटीविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.