Shahid Kapoor : बापरे! शाहिद कपूरला एक्स गर्लफ्रेंड करीनाची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:03 PM2023-06-08T18:03:53+5:302023-06-08T18:09:24+5:30

Shahid Kapoor And Kareena Kapoor : शाहिद कपूर एका मुलाखतीत त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर खानबद्दलही बोलला आहे.

Shahid Kapoor want to steal one quality of ex girlfriend kareena kapoor khan | Shahid Kapoor : बापरे! शाहिद कपूरला एक्स गर्लफ्रेंड करीनाची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात'

Shahid Kapoor : बापरे! शाहिद कपूरला एक्स गर्लफ्रेंड करीनाची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात'

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) त्याचा नवीन चित्रपट ब्लडी डॅडीच्या प्रमोशनसाठी अनेक मुलाखती देत ​​आहे. याच दरम्यान शाहिद कपूर एका मुलाखतीत त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर खानबद्दलही (Kareena Kapoor Khan) बोलला आहे. एका मुलाखतीत शाहिदने करीना कपूरकडून तिची 'सुपरस्टार क्वालिटी' चोरायची असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच अभिनेत्याने दीपिका पादुकोणकडून (Deepika Padukone) एक खास गोष्ट चोरायची असल्याचं म्हटलं आहे. 

शाहिद कपूरने अलीकडेच एका एंटरटेनमेंट पोर्टलला मुलाखत दिली आहे, जिथे रॅपिड फायर राउंड दरम्यान, अभिनेत्याला काही सेलिब्रिटींची नावं विचारण्यात आली होती की त्याला त्यांच्याकडून काय चोरायचं आहे. शाहिदसमोर करीना कपूरचे नाव घेतले असता, अभिनेत्याने सुपरस्टार क्वालिटी म्हणत उत्तर दिलं. तसेच शाहिद कपूर म्हणाला, तिच्याकडे नेहमीच सुपरस्टार क्वालिटी आहे, अगदी पहिल्या चित्रपटापासून, ही तिची खास गोष्ट आहे.

जेव्हा अभिनेत्याला दीपिका पादुकोणकडून काहीतरी चोरण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्याने उत्तरात डोळे असं सांगितलं. शाहीद म्हणाला, तिचे डोळे मोठे, सुंदर आणि एक्सप्रेसिव्ह आहेत. शाहिद कपूर आणि दीपिका पादुकोण यांनी संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतर शाहिद-दीपिका कधीच पडद्यावर एकत्र दिसले नाहीत.

शाहिद कपूर लवकरच एक्शन-थ्रिलर ब्लडी डॅडीमध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेता योद्धा या आणखी एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पटनीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Shahid Kapoor want to steal one quality of ex girlfriend kareena kapoor khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.