Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:12 PM2022-01-22T12:12:25+5:302022-01-22T12:21:02+5:30

'पद्मावत'मध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone), शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत दिसले होते.

Shahid Kapoor was not first choice for Padmavat movie | Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक्

Shahid Kapoor नाही तर पद्मावतसाठी हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंती, नाव वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

संजय लीला भन्साळी  (Sanjay Leela Bhansali)  यांचा पद्मावत हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा मेगा बजेट चित्रपट सर्वांनाच आवडला. या चित्रपटात दीपिका पादुकोण (Deepika Padukone), शाहिद कपूर  (Shahid Kapoor)  आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत दिसले होते. तिन्ही कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.  पण तुम्हाला माहित आहे का की, रतन सिंगच्या व्यक्तिरेखेसाठी शाहिद कपूर निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. शाहिदच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला कास्ट करायचे होते पण दीपिकामुळे ते होऊ शकले नाही.

शाहिद कपूर नव्हता पहिली चॉईस 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन सिंहच्या भूमिकेसाठी शाहिद कपूर निर्मात्यांची पहिली पसंत नव्हती. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी विकी कौशलशी संपर्क साधला होता आणि त्यानेही या भूमिकेसाठी होकार दिला होता. 2016 मध्ये, विकी कौशलने फक्त काही चित्रपटांमध्ये काम केले पण अभिनेता संजय लीला भन्साळी यांच्या व्हिजनवर सर्वांचा विश्वास आहे. जे अभिनेत्याला परफॉर्मर बनवतात.

दीपिका पादुकोणला नव्हते करायचे विकीसोबत काम 
मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोणमुळे विकी कौशलला या चित्रपट कास्ट नाही केले गेले. रिपोर्टनुसार, दीपिकाला विकीसोबत काम करायचे नव्हते, तिला तिच्या पतीची भूमिका साकारण्यासाठी मोठा अभिनेता हवा होता. खिलजीसोबत दीपिकाचा कोणताही मोठा सीन नव्हता. राजाच्या भूमिकेसाठी मोठ्या नावाचा विचार व्हायला हवा, असे त्याने निर्मात्यांना सांगितले.

Web Title: Shahid Kapoor was not first choice for Padmavat movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.