Video : शाहीद कपूरची बायको चक्क दादरच्या फुल मार्केटमध्ये पोहोचली, घराच्या सजावटीसाठी केली खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 13:15 IST2023-06-15T13:14:15+5:302023-06-15T13:15:50+5:30
दादरचं फूल मार्केट म्हणजे गर्दी आणि गजबज.

Video : शाहीद कपूरची बायको चक्क दादरच्या फुल मार्केटमध्ये पोहोचली, घराच्या सजावटीसाठी केली खरेदी
बॉलिवूड कलाकार आणि त्यांचं कुटुंब किती लक्झरियस आयुष्य जगतात हे आपण बघतोच. पण जेव्हा हेच कलाकार सामान्य लोकांसारखं गर्दीच्या ठिकाणी येतात तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं. अशीच एक सेलिब्रिटी दादरच्या फूल मार्केटमध्ये पोहोचली आहे. ती म्हणजे अभिनेता शाहीद कपूरची (Shahid Kapoor) बायको मीरा राजपूत (Meera Rajput). तिच्या युट्यूब चॅनल शूटसाठी ती फूल मार्केटमध्ये पोहोचली होती.
दादरचं फूल मार्केट म्हणजे गर्दी आणि गजबज. सकाळच्या वेळी आणि सणासुदीच्या दिवशी तर इथे पाय ठेवायलाही जागा नसते. अशा गर्दीत शाहीद कपूरची बायको मीरा राजपूत पोहोचली. घरात फुलांची सजावट करण्यासाठी ती दादरच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध फूल मार्केटला आली आहे. मार्केटमध्ये फिरतानाचा, फूल विक्रेत्यांसोबत भाव करतानाचा व्हिडिओ तिने तिच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. यानंतर या फुलांना ती घरात कशा प्रकारे सजवते हेही तिने व्हिडिओतून दाखवलं आहे.
मीरा राजपूत इतर स्टार्सच्या पत्नींसारखी फार प्रकाशझोतात राहत नाही. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचं वेगळेपण दाखवते. त्यामुळेच अनेकांना इतर स्टार्सच्या पत्नींपेक्षा मीर राजपूत जास्त आवडते. शाहीद आणि मीरा दोघांच्या वयात १४ वर्षांचं अंतर आहे. त्यांना मिशा आणि झैन ही दोन मुलंही आहेत.