इशान खट्टरसोबत शाहिद कपूर काम करणार; पण एका अटीवर!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 17:12 IST2019-08-25T17:11:50+5:302019-08-25T17:12:37+5:30
शाहिद कपूर सध्या त्याच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाला मिळालेले यश उपभोगत आहे. कबीर सिंगने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमुळे पुन्हा एकदा शाहिद चर्चेत आला. काही दिवसांपूर्वी तो त्याचा भाऊ अभिनेता इशांत खट्टर याच्यासोबत युरोपमध्ये केलेल्या बाईकिंगमुळे चर्चेत आला होता.

इशान खट्टरसोबत शाहिद कपूर काम करणार; पण एका अटीवर!!
अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाला मिळालेले यश उपभोगत आहे. कबीर सिंगने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमुळे पुन्हा एकदा शाहिद चर्चेत आला. काही दिवसांपूर्वी तो त्याचा भाऊ अभिनेता इशांत खट्टर याच्यासोबत युरोपमध्ये केलेल्या बाईकिंगमुळे चर्चेत आला होता. शाहिद त्याच्या भावाबद्दल खूप जास्त सेंसेटिव्ह असून तो त्याला कायम करिअरबाबत गाईड करत असतो. पण, सध्या मात्र, एक वेगळीच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे हे दोघे भाऊ आता एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण, शाहिदने एक अट ठेवली आहे.
अलीकडेच एका शोमध्ये शाहिद कपूरला एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सांगितले की,‘मी इशानसोबत काम करायला कायम तयार आहे. मात्र, एका अटीवर ती म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट इंटरेस्टिंग असली पाहिजे. एकतर फॅमिली मेंबरसोबत काम करणं खूपच कठीण असतं, काम करण्याचं प्रेशर असतं. ’
भाऊ इशानचे कौतुक करताना शाहिद थकत नाही. तो त्याच्याबद्दल सांगतो,‘मला माहित होतं की, पहिल्यापासून इशान हा डान्सिंग किंवा अॅक्टिंगमध्येच करिअर करणार आहे. मला आठवतं की, शानदार चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत इशानने खूप चांंगला डान्स केला होता. तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा होता.’ चला तर मग, बघूयात शाहिद आणि इशान हे दोघे केव्हा फॅन्सची एकत्र काम करण्याची इच्छा पूर्ण करतात ते.