​शाहिद कपूरने इतकी घेतली मेहनत की, पाच दिवसांत घटले चार किलो वजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 09:19 AM2017-12-07T09:19:38+5:302017-12-07T14:49:38+5:30

‘पद्मावती’ची रिलीज डेट अद्याप आलेली नाही. पण पे्रक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘पद्मावती’ तयार व्हायला दोन वर्षांचा ...

Shahid Kapoor worked so hard, we lost four kilos in five days! | ​शाहिद कपूरने इतकी घेतली मेहनत की, पाच दिवसांत घटले चार किलो वजन!

​शाहिद कपूरने इतकी घेतली मेहनत की, पाच दिवसांत घटले चार किलो वजन!

googlenewsNext
द्मावती’ची रिलीज डेट अद्याप आलेली नाही. पण पे्रक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘पद्मावती’ तयार व्हायला दोन वर्षांचा कालावधी लागला आणि प्रत्येक कलाकाराने यासाठी तितकीच कठोर मेहनत घेतली.  शाहिद कपूरचेच घ्याल तर त्याने तलबाजी शिकण्यासाठी रक्ताचे पाणी केलेयं.
अलीकडे एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. मी खास ‘पद्मावती’साठी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले. तलवार चालवणे एक वेगळे कौशल्य आहे. पण हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. ३० ते ४० किलोची तलवार हातात घेऊन त्याचा मी हा सराव केला. शारिरीकदृष्ट्या हे काम प्रचंड थकवणारे होते. या काळात केवळ पाच दिवसांत माझे वजन चार किलोंनी कमी झाले. भन्साळींना काय हवे, यावर माझे लक्ष असायचे, असे शाहिदने सांगितले.

 ‘पद्मावती’च्या रिलीजबद्दलही शाहिद बोलला. ‘पद्मावती’ लवकरच रिलीज व्हावा, एवढीच आशा या घडीला आम्ही करू शकतो. चित्रपट कधी रिलीज होतोयं, सध्यातरी मला ठाऊक नाही.पण खरे सांगायचे तर चित्रपटात काहीही आक्षेपार्ह आहे, असे मला वाटत नाही. आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत व्यक्तिला आरोपी संबोधले जात नाही. त्यामुळे लोकांनी आधी चित्रपट बघावा आणि नंतर प्रतिक्रिया द्यावी, असे मला वाटते, असेही शाहिद म्हणाला. या चित्रपटात शाहिद कपूरने राणी पद्मावतीचा पती राजा रावल रतनसिंगची भूमिका साकारली आहे.

ALSO READ : padmavati controversy : ​माफ करा, पण ‘पद्मावती’चे प्रदर्शन वाटू लागलेयं अशक्य!!

आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाला झाला नाही, इतका विरोध‘पद्मावती’ला होतो आहे. अगदी ‘पद्मावती’चे शूटींग सुरु झाले त्या दिवसांपासून हा चित्रपट वादात सापडला आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, राजस्थानातील राजघराणे, धर्मगुरु अशा अनेकांनी या चित्रपटाविरोधात मोर्चा उघडला आहे. ‘पद्मावती’त ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा या सर्वांचा आरोप आहे. काहींनी तर थेट भन्साळींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या चित्रपटात  राणी पद्मावतीची भूमिका साकारणाºया दीपिका पादुकोणलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकण्यात आले आहे.  

Web Title: Shahid Kapoor worked so hard, we lost four kilos in five days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.