​‘पद्मावती’वर असा भाळला शाहिद कपूर! म्हटले, ‘एक दिल है.. एक जान है...’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 07:23 AM2017-11-13T07:23:38+5:302017-11-13T12:53:38+5:30

एकीकडे ‘पद्मावती’च्या रिलीजला विरोध होत असताना दुसरीकडे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता दिवसांगणिक वाढताना दिसतेय. अशातच या दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग स्टारर चित्रपटातील आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Shahid Kapoor is worried about Padmavati! Said, 'there is a heart .. there is a life ...' !! | ​‘पद्मावती’वर असा भाळला शाहिद कपूर! म्हटले, ‘एक दिल है.. एक जान है...’!!

​‘पद्मावती’वर असा भाळला शाहिद कपूर! म्हटले, ‘एक दिल है.. एक जान है...’!!

googlenewsNext
ीकडे ‘पद्मावती’च्या रिलीजला विरोध होत असताना दुसरीकडे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता दिवसांगणिक वाढताना दिसतेय. अशातच या दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग स्टारर  चित्रपटातील आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. होय,‘एक दिल है.. एक जान है’ असे या गाण्याचे बोल आहेत. राणी पद्मावती आणि राजा रतन सिंग यांच्यातील अलवार नात्याचा एक एक पदर उलगडून दाखवणारे हे गाणे पाहणे एक आल्हाददायी अनुभव आहे.



ए एम तुराझ यांनी ‘एक दिल है..’ हे गाणे लिहिले असून चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. शिवम पाठकने गायलेले हे गाणे दीपिका व शाहिद यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.यापूर्वी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घूमर’ हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला होता. सोशल मीडियावर काही तासांत लाखों लोकांनी हे गाणे पाहिले होते. ‘एक दिल है..’  हे या चित्रपटाचे दुसरे गाणे आहे. 
 येत्या १ डिसेंबरला ‘पद्मावती’ रिलीज होतोय. दीपिका पादुकोणने यात राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीची भूमिका साकारली आहे. शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे.  तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग प्रथमच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.  अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.
 भन्साळी यांचा हा चित्रपट सध्या प्रचंड वादात आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातेत या चित्रपटाच्या रिलीजला विरोध होत आहे. हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहोचला होता. अर्थात  सुप्रीम कोटार्ने मात्र भन्साळींना दिलासा दिला आहे. ‘पद्मावती’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आता ‘पद्मावती’च्या रिलीजचा वाद सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात आला आहे. कारण ‘पद्मावती’ रिलीज व्हावा की नाही, याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेईल, असे सुप्रीम कोटार्ने म्हटले आहे. काल परवाच ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण दिले होते. कुणाच्याही भावना दुखावतील, असे काहीही चित्रपटात नाही. चित्रपट साकारताना आम्ही राजपुत घराणेशाहीची मानमयार्दा राखली आहे, असे त्यांनी म्हटले होते. 

Web Title: Shahid Kapoor is worried about Padmavati! Said, 'there is a heart .. there is a life ...' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.