क्या बात है शाहिद कपूर...! त्याचा हा सिनेमा विकी कौशलच्या ब्लॉकबास्टर 'उरी'चाही मोडणार रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 03:12 PM2019-07-10T15:12:35+5:302019-07-10T15:13:34+5:30

शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांचा नुकताच 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित झाला.

Shahid Kapoor's film Kabir Singh almost breaks Vicky Kaushak's movie Uri record | क्या बात है शाहिद कपूर...! त्याचा हा सिनेमा विकी कौशलच्या ब्लॉकबास्टर 'उरी'चाही मोडणार रेकॉर्ड

क्या बात है शाहिद कपूर...! त्याचा हा सिनेमा विकी कौशलच्या ब्लॉकबास्टर 'उरी'चाही मोडणार रेकॉर्ड

googlenewsNext

शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांचा नुकताच 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. हा चित्रपट भारतातील सर्वाधीक कमाई करणारा हिंदी चित्रपटाच्या टॉप टेन लिस्टमध्ये सामील होण्यासाठी काही कालवधी बाकी आहे. बुधवारच्या कमाईनंतर कबीर सिंग चित्रपटाचा टॉप टेनमध्ये समावेश होईल. 

भारतात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट उरीः द सर्जिकल स्ट्राइकनंतर कबीर सिंग अकराव्या स्थानावर आहे. बॉलिवूड हंगामाच्या नुसार, भारतीय बाजारानुसार अकरा आठवड्यात उरी चित्रपटाचं भारतीतल एकूण कलेक्शन २४५.३६ कोटी रुपये इतकी आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्यानुसार तिसऱ्या आठवड्यात मंगळवारपर्यंत कबीर सिंगची कमाई २४३. १७ कोटी इतके झाली आहे. टॉप कमाईच्या यादीत दहाव्या क्रमांकावर येण्यासोबतच कबीर सिंग यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा बनू शकतो.


तरण आदर्शने दिलेल्या लेटेस्ट आकडेवारीनुसार, तिसऱ्या आठवड्यात विश्व चषकच्या सेमी फायनल क्रिकेट सामना असतानाही कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी चित्रपटानं ५.४० कोटी, शनिवारी ७.५१ कोटी, रविवारी ९.६१ कोटी, सोमवारी ४.२५ कोटी आणि मंगळवारी ३.२० कोटींची कमाई केली.


या यादीत पहिल्या क्रमांकावर प्रभास अभिनीत बाहुबली २ सहभागी आहे. त्यानंतर दंगल, तिसऱ्या नंबरवर संजू, चौथ्या क्रमांकावर पीके, पाचव्या क्रमांकावर टायगर जिंदा है, सहाव्या क्रमांकावर बजरंगी भाईजान, सातव्या क्रमांकावर पद्मावत, आठव्या क्रमांकावर सुल्तान व नवव्या क्रमांकावर धूम ३ चित्रपट आहे. 

Web Title: Shahid Kapoor's film Kabir Singh almost breaks Vicky Kaushak's movie Uri record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.