शाहिदचा फ्लॉप शो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:16 AM2016-01-16T01:16:23+5:302016-02-06T11:35:00+5:30

सध्या शाहिद कपूरचे वाईट दिवस सुरू आहेत. या आठवड्यात प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट शानदार बॉक्स ऑफिसवर शानदार व्यवसाय करण्यात ...

Shahid's flop show | शाहिदचा फ्लॉप शो

शाहिदचा फ्लॉप शो

googlenewsNext
्या शाहिद कपूरचे वाईट दिवस सुरू आहेत. या आठवड्यात प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट शानदार बॉक्स ऑफिसवर शानदार व्यवसाय करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. चित्रपटाची परिस्थिती इतकी डळमळीत आहे की, येणार्‍या दिवसात सुधारणा होण्याची काही शक्यता दिसत नाही. शानदारला फ्लॉप चित्रपट मानल्यास शाहिद कपूरच्या करिअरवर मोठे प्रश्न उभे राहते. शानदारच्या प्रदर्शनापूर्वी असे म्हटले जायचे की, शानदारचा बॉक्स ऑफिसवरील परिणाम त्यांच्या करिअरसाठी निर्णायक ठरू शकतो. या चित्रपटात ते सर्व होते, ज्यामुळे यापासून शाहिद एका हिट चित्रपटाची अपेक्षा करू शकत होता. शाहिद कपूरच्या सध्या प्रदर्शित झालेल्या यादीवर नजर टाकली तर फ्लॉप चित्रपटांची लांबलचक रांग लागलेली दिसते. यात शानदारची आणखी एक भर पडली आहे. शानदारपूर्वी शाहिदच्या प्रदर्शित चित्रपटांमध्ये गेल्या वर्षी आलेल्या विशाल भारद्वाज यांचा हैदर चित्रपट होता, ज्यामध्ये शाहिदच्या परफॉर्मंसची प्रशंसा नक्की झाली, मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपट काही चालला नाही. २0१३ मध्ये प्रभूदेवाचा आर. राजकुमार आणि राजकुमार संतोषी यांचा फटा पोस्टर निकला हीरो, २0१२ मध्ये कुणाल कोहली यांचा तेरी मेरी कहानी, २0११ मध्ये त्याचे वडील पंकज कपूर दिग्दर्शित मौसम, २0१0 मध्ये यशराज यांचा बदमाश कंपनी और पाठशाला, चांस पे डांस आणि दिल बोले हडप्पा सोबतच बोनी कपूर यांचा मिलेंगे मिलेंगे हे चित्रपट काही फार चांगले करू शकले नाही.
शानदार अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झाला होता. या यादीला पाहिले तर लक्षात येते की, २0१0 पासून शाहिदचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला नाही. २00९ मध्ये विशाल भारद्वाज यांचा कमीने आणि त्यापूर्वी २00७ मध्ये इम्तियाज अली यांचा जब वी मीट यांना शाहिदच्या शेवटच्या हिट चित्रपटांमध्ये मोजले जाऊ शकते. या चित्रपटांच्या दरम्यान २00८ मध्ये विद्या बालन सोबत आलेल्या किस्मत कनेक्शन चित्रपटाची 'किस्मत'ही बॉक्स ऑफिसवर खराब राहिली होती.
ढोबळमानाने पाहिले तर २00७ पासून २0१५ पर्यंत शाहिद कपूरचे केवळ जब वी मीट आणि कमीने हे दोनच चित्रपट हिट राहिले आणि उर्वरित सर्व चित्रपट एका ओळीने फ्लॉप ठरले. कर्मशियल चित्रपटांच्या महाकर्मशियल जगात कोणत्या मोठय़ा स्टारच्या चित्रपटांचे हे आकडे केवळ चकीत करणारेच नाही तर ते हेदेखील दाखवितात की शाहिदला संधी खूप मिळाल्या मात्र यश गाठता आले नाही.
शाहिदच्या टॅलेंटबद्दल काही शंका नाही. त्याचा अभिनय आणि डांसच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. मग प्रश्न हा उरतो की, सलग त्याचे चित्रपट फ्लॉप का होतात. हे स्पष्ट आहे की, जर चित्रपट सलग फ्लॉप होत असतील तर केवळ नशिबाला दोष देणे योग्य होणार नाही. दर्शकांच्या पसंतीसोबत वारंवार धोका करणार्‍या या चित्रपटांची कथा इतकी नाजूक होती की, प्रेक्षकांनी तिला नाकारले आणि एवढय़ा कमकुवत चित्रपटांमध्ये काम करण्यास सहमती देत ही जोखीम शाहिद कपूरने पत्करली.
शाहिद भलेही, फ्लॉप चित्रपटांमुळे मला काही फरक पडत नाही असे स्वत:चे सांत्वन करू शकतो किंवा तो फ्लॉप चित्रपटांमधून बोध घेऊन आपल्या चुकांना सुधारू शकतात, यातला कोणता पर्याय निवडावा हे अर्थातच शाहिदला ठरवायचे आहे.

Web Title: Shahid's flop show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.