शाहिदचे वर्कआऊट सेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 05:21 PM2016-11-27T17:21:52+5:302016-11-27T17:21:52+5:30

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटात शाहिद राजाची भूमिका साकारणार आहे.

Shahid's workout session! | शाहिदचे वर्कआऊट सेशन!

शाहिदचे वर्कआऊट सेशन!

googlenewsNext
हिद कपूर सध्या ‘पद्मावती’ चित्रपटासाठी विशेष मेहनत घेताना दिसतोय. दरदिवशी तो तास न तास जीममध्ये कसरती करून त्याची बॉडी जास्तीत जास्त हॉट बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्याने एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘शेमलेस पोजिंग सेल्फी’ या कॅप्शनसह त्याने फोटो अपलोड केलाय. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटात शाहिद राजाची भूमिका साकारणार आहे.

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला केव्हा सुरूवात होणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. आता शूटिंग सुरू झाल्याने शाहिद रात्रंदिवस त्याच्या भूमिकेसाठी मेहनत घेतो आहे. शाहिद कपूरने आत्तापर्यंत अनेक भूमिका प्रचंड मेहनत घेऊन साकारल्या आहेत.

शाहिद त्याच्या भूमिका आणि चित्रपटांबद्दल नेहमी त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर अपडेट करत असतो. त्यामुळे त्याचे चाहतेही त्याच्या भूमिकांसाठी तेवढेच उत्सुक असतात. आगामी ‘रंगून’ चित्रपटासाठी देखील तो तेवढाच उत्सुक आहे. सैफ अली खान आणि कंगणा राणौत हे या चित्रपटात त्याचे सहकलाकार असतील. दोन्ही चित्रपटात शाहिदसोबत तगडी स्टारकास्ट असल्याने शाहिदला त्याची भूमिका उठावदार दिसण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. 











 

Web Title: Shahid's workout session!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.